'एकदा कॅमेरा तुमच्याकडे फिरवा त्यानंतर...', Taapsee Pannu कोणावर एवढी संतापली, VIRAL VIDEO

माझ्याशी नीट बोलायचं...  Taapsee Pannu कोणावर संतापली, पाहा VIRAL VIDEO   

Updated: Aug 9, 2022, 12:21 PM IST
'एकदा कॅमेरा तुमच्याकडे फिरवा त्यानंतर...', Taapsee Pannu कोणावर एवढी संतापली, VIRAL VIDEO  title=

मुंबई : 'पिंक',  'थप्पड',  'बदला'  इत्यादी महिलांवर आधारित सिनेमांमुळे अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) प्रेक्षकांच्या भेटीस आली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला सिनेमांतून वाचा फोडण्याचा तापसीने केला. तापसी कायम तिच्या वेग-वेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या तापसीचा एक व्हिडीओ (Taapsee Pannu Viral video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रचंड संतापलेली दिसत आहे. (Taapsee Pannu argument  with paparazzi)

सध्या तापसी आगामी 'दोबारा' (Dobaaraa) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी तापसी मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये (Mithibai College in Mumbai) पोहोचली होती. तेव्हा अभिनेत्रीला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींनी एकच गर्दी केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पापाराझींनी अनेकदा सांगून देखील तापसी एक क्षणही थांबली नाही. जेव्हा पापाराझींनी (paparazzi) आम्ही देखील फार वेळ झाला याठिकाणी तुझ्यासाठी उभे आहोत असं म्हणत तक्रार केली तेव्हा तापसी त्यांच्यावर भडकली आणि म्हणाली 'मुझसे तमीज से बात करिए...' 

काय म्हणाली तापसी....
पापाराझींवर संताप व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली, 'मला जे सांगण्यात आलं आहे, तेच मी करत आहे. तुम्ही सगळे माझ्यावर का ओरडत आहात. माझ्याशी नीट बोलायचं. मी ,माझं काम करत आहे. ज्या ठिकाणी मला बोलावण्यात येत. त्याठिकाणी मी वेळेत जाते. माझ्यासोबत नीट बोलाल तर मी देखील तुमच्यासोबत निट बोलल... ' असं तापसी म्हणाली. (argument  with paparazzi )

पुढे अभिनेत्री म्हणाली, 'कॅमेरा माझ्या दिशेला आहे म्हणून सगळ्यांना मी दिसत आहे. पण तोच कॅमेरा तुमच्याकडे वळवा तेव्हा कळेल तुम्ही देखील कशा प्रकारे माझ्यासोबत बोलत आहात...' सध्या या व्हिडीओमुळे तापसी पन्नू तुफान चर्चेत आली आहे.