स्विगी बॉयने दिलेल्या सल्यावर गायिका भडकली

सोशल मीडियावर ट्रोल 

Updated: Nov 25, 2019, 04:06 PM IST
स्विगी बॉयने दिलेल्या सल्यावर गायिका भडकली  title=

मुंबई : तमिळची लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी श्रीपदा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चिन्मयीने सोशल मीडियावर काही लोकांना अगदी सडेतोड उत्तर दिलं आहे. स्विगी बॉयने केलेल्या आपत्तिजनक कमेंटवर तिने आपलं मत ट्विटद्वारे व्यक्त केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

This is important. One of the things that safe / unsafe touch workshops organized by Red Elephant deal with is naming body parts for what they are. Body parts aren’t cuss words. They shouldn’t be associated with shame. If a child is taught to say hand, why not penis / vagina? It is one of the first steps that a child can understand that there is NOTHING shameful about body parts. Thereby, God forbid, a child gets molested, they will be safe to come and tell caregivers exactly what happened. If our children aren’t communicating properly, it is our fault. This is what gets carried well into adulthood. With grown adult men and women being unable to describe, without a sense of shame, and just report things as they are, to doctors or police. Imagine a day when all adults will be able to describe to doctors and the police just as clinically as they could describe, say, an accident or any other crime.

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on

स्विगीवरून ऑर्डर केलेल्या गोष्टीची डिलीवरी करायला आलेल्या बॉयने चिन्मयीला फुकटचा सल्ला दिला आहे. यावर चिन्मयी भडकली असून तिने ट्विट केलं आहे. डिलीवरी बॉयने चिन्मयीला घरी देखील शॉल ओढून राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर स्विगीला ट्विटकरून प्रश्न विचारला आहे की, स्विगी, तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना फक्त कामाशी काम ठेवण्याचा सल्ला द्याल. एका डिलीवरी बॉयने माझ्या घरी येवून मला तू घरी पण शॉल घे असं सांगणं याचा काय अर्थ आहे. या डिलीवरी बॉयला देखील आम्हीच शहाणपण शिकवायचं. 

याबरोबरच चिन्मयीने अनेक प्रश्न विचारले आहेत. मी माझ्या घरी काय घालायचं, हे कोण सांगणारे? ते ही माझ्या घरी येऊन. चिन्मयीचं हे ट्विट व्हायरल झाल्यावर काहींनी तिला ट्रोल केलं. त्यानंतर पुन्हा तिने ट्विट करून आपला राग व्यक्त केला की, मी त्या प्रत्येक व्यक्तीला ब्लॉक करेल जो या गोष्टीची मस्करी करेल.