Malaika Arora Video: चाहत्यांसाठी गोड बातमी, मलायका करतेय दुसऱ्या लग्नाची तयारी...

ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय (Active) असते. याचमुळे आजही तिची फॅन फॉलोईंग (Fan following) आहे.

Updated: Oct 11, 2022, 08:12 PM IST
Malaika Arora Video: चाहत्यांसाठी गोड बातमी, मलायका करतेय दुसऱ्या लग्नाची तयारी... title=
Sweet news for fans Malaika is preparing for second marriage nz

Malaika Arora Arjun Kapoor Wedding: मलायका अरोरा (Malaika Arora) ही अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीचा (Bollywood Industry) एक महत्त्वाचा भाग आहे जरी चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय (Active) असते. याचमुळे आजही तिची फॅन फॉलोईंग (Fan following) आहे. (Sweet news for fans Malaika is preparing for second marriage nz)

आणखी वाचा - Hindi cinema: ज्यांच्या चित्रपटात झळकण्यासाठी अभिनेत्री स्वप्न पाहायची त्यांचाच चित्रपट सोडून पळाल्या होत्या Hema Malini!

 

सलमान खानची (Salman Khan) वहिनी म्हणजेच अरबाज खानची (Arbaaz Khan) पत्नी असलेली मलायका आता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट (Date) करत आहे.
मलायकाने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री बिकिनी किंवा बॅकलेस ड्रेसेस सोडून अतिशय सुसंस्कृत स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओतील तिचे सर्व लूक पाहून चाहत्यांना वाटते की मलायकाने तिच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली आहे.

बोल्ड ड्रेसेज सोडून मलायकाने असा केला ड्रेस अप!

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर (instagram) एक व्हिडिओ शेअर केला आहे, सुरुवातीला मलायकाने लाल रंगाचा सूट घातला होता. यानंतर कधी रंगीबेरंगी लेहेंगा तर कधी अनारकली सूटमध्ये मलायकाचे अनेक भारतीय लूक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले आहेत. मलायका खूपच सुंदर दिसत होती आणि अनेक दिवसांनंतर चाहत्यांनी तिला बिकिनी किंवा शॉर्ट ड्रेसेजमध्ये नाही तर भारतीय कपड्यांत पाहिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा - Amazon Great Indian Festival 2022: बनारसी साडीत खुलवा स्वत:चं सौंदर्य; मौनी रॉय, चिंत्रांगदाचा लूक सहजपणे करा रिक्रिएट

 

लूक पाहून चाहते म्हणाले- लग्नाची तयारी सुरू झाली का?

कधी कपाळावर बिंदी तर कधी कानातले मोठे झुमके, मलायका एवढ्या सुंदर रंगात सजली होती की अनेक चाहत्यांना वाटले की मलायकाने तिच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या लूकचे कौतुक करत आहेत, मात्र मलायकाचा हा स्टाईल मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला नक्कीच पटला असेल.

वास्तविक हा व्हिडीओ ब्रँड कोलॅबोरेशनचा (Brand Collaboration) आहे ज्यामध्ये मलायका इंडियन वेअरच्या ब्रँडसाठी काम करत आहे आणि त्याच ब्रँडच्या ड्रेसेजमध्ये पोज देत आहे.