हृतिकचं एक्स पत्नी सुझैनबाबत मोठं वक्तव्य; ऐकून तुम्हाला बसेल धक्का

अभिनेता हृतिक रोशनने सुझैनची इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली 

Updated: Jun 4, 2022, 08:19 PM IST
हृतिकचं एक्स पत्नी सुझैनबाबत मोठं वक्तव्य; ऐकून तुम्हाला बसेल धक्का title=

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक्स पत्नी सुझैन खानचे तिच्या नव्या वाटचालीबद्दल कौतुक केलं आहे. अभिनेता हृतिक रोशनने सुझैनची इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली जिथे तिने तिच्या नव्या पाऊलाबद्दल घोषणा केली आहे. घटस्फोटानंतर हृतिक आणि सुझैनच्या अशा प्रकारचं बाँडिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुझैनने शेअर केली ही पोस्ट  
तिने पोस्ट शेअर करत म्हटलं, "ऊर्जा कधीही खोटं बोलत नाही.  स्वत:ला अशा लोकांभोवती ठेवा जे खूप सकारात्मक आहेत. त्यामुळे तुम्ही चमकू शकाल आणि जगालाही चमकताना दिसाल."

हृतिकची कमेंट
सुझैनच्या पोस्टवर कमेंट करत, हृतिकने लिहिलं की, "सुझैनचं खूप अभिनंदन, हे आश्चर्यकारक होतं!" यानंतर त्याने एक इंस्टाग्रामवर स्टोरी देखील शेअर केली आणि लिहिलं, "सुझैनचा खूप अभिमान आहे! तू सुपरस्टार आहेस."

हृतिक सुझैनचा घटस्फोट
लग्नानंतर एकत्र 13 वर्ष राहिल्यानंतर  2014 मध्ये दोघांनी वेगळं आयुष्य निवडलं. हृतिक आणि सुझैन यांना दोन मुलं आहेत.  हृतिक तमिळ सुपरहिट चित्रपट विक्रम वेधाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक वेधाची भूमिका साकारणार आहे.