तो माझा... ; दत्तक मुलाच्या चर्चांवर अखेर सुष्मितानं सोडलं मौन

अनेकांनीच हा तिचाच दत्तक मुलगा असल्याचा तर्क लावला.   

Updated: Jan 14, 2022, 01:51 PM IST
तो माझा... ; दत्तक मुलाच्या चर्चांवर अखेर सुष्मितानं सोडलं मौन  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen)हिनं अचानकच लक्ष वेधलं ते म्हणजे एका व्हिडीओच्या निमित्तानं. सुष्मिता तिच्या मुलींसोबत कुठेतरी बाहेर गेलेली असताना एक लहान मुलगाही तिच्यासोबत दिसला. अनेकांनीच हा तिचाच दत्तक मुलगा असल्याचा तर्क लावला. 

सोशल मीडियावर या इतक्याच चर्चा पुरेशा होत्या. पाहता पाहता सुष्मितानं तिसरं मुलही दत्तक घेतलं या बातमीनं जोर धरला. फोटोही व्हायरल झाले. 

अखेर सुष्मितानं पुढे येत हे सर्व चित्र अधिक स्पष्ट केलं. ट्विट करत तिनं हा गुंता सोडवला. 

'गॉडसन एमड्यूसशी सोशल मीडियावर त्याच्याबाबतच्या चर्चांबाबत बोलताना. त्याचे हावभावच सगळं सागतायत', असं तिनं ट्विटमध्ये लिहिलं. 

बाळाची आई श्रीजया हिनंच हा फोटो काढल्याचंही सुष्मितानं ट्विटमध्ये सांगितलं. 

थोडक्यात काय, तर हा सुष्मितानं हा नेमका कोणाचा मुलगा हे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं. 

बॉलिवूडची ही सौंदर्यवती सध्या याव्यतिरिक्तही अनेक कारणांसाठी चर्चेत आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच मॉडेल रोमन शॉल याच्याशी असणारं तिचं नातं संपुष्टात आलं. 

प्रेमाच्या नात्यात आलेल्या या वादळाला सामोरं जात असतानाही सुष्मिता खंबीरपणे उभी राहिली. हे पाहता चाहत्यांनी तिचं कौतुकत केलं.