रोहमनने त्याचं वय लपवलं होतं; सुष्मिता सेनचं स्पष्टीकरण

सुष्मिता सेन रूपेरी  पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते.  

Updated: Jun 12, 2020, 05:21 PM IST
 रोहमनने त्याचं वय लपवलं होतं; सुष्मिता सेनचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : बॉलिवूड अभनेत्री सुष्मिता सेन रूपेरी  पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात असते. सुष्मिता  लॉकडाऊन दरम्यान तिचा बॉयफ्रेंड  रोहमन शॉलसोबत राहत आहे. या काळात सुष्मिता आणि  रोहमन शॉल कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांनी केलेले पोस्ट सोशल मीडिया तुफान व्हायरल देखील होतात. शिवाय नेटकऱ्यांनी बऱ्याच वेळा दोघांच्या वयात असलेल्या अंतरावरून देखील चर्चा  केली होती. याच बाबतील सुष्मिताने एक मोठा खुलासा केला आहे. 

एका मुलाखतीत सुष्मिताने सांगितलं की, सुरवातीच्या काळात रोहमनने त्याचं वय लपवलं होतं. सांगायचं झालं तर त्याच्या नात्याची सुरूवात इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर त्यांनी भेटण्याचे ठरवले. परंतु सुष्मिताला रोहमनच्या वयाची काहीच कल्पना नव्हती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I love you my tough guy @rohmanshawl A stable relationship needs a balanced center, flexible mind, mutual strength & deep trust’ How symbolic this posture!!! #sharing #us #togethernessI love you guys!!#fly

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

शिवाय रोहमनने देखील त्याच्या वया संबंधी कधी उल्लेख केला नाही. अनेक दिवस लोटल्यानंतर सुष्मिताला माहित पडलं की दोघांमध्ये तब्बल १७ वर्षांचं अंतर आहे. असं स्पष्टीकरण खुद्द सुष्मिताने दिलं आहे. 

रोहमन आणि सुष्मिता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत, त्यांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. शिवाय सुष्मिता तिच्या फिटनेस आणि वर्कआउट व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.