मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या फिटनेस आणि वर्कआउट व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींसोबतचे अनेक डान्स व्हिडिओही शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सुष्मिता तिच्या नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे.
हॉलिवूडमधून सुरु झालेल्या #BottleCapChallenge ची क्रेझ बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि शर्लिन चोप्रानंतर आता सुष्मितानेही तिच्या मुली आणि बॉयफ्रेंडसोबत #BottleCapChallenge पूर्ण केलं आहे. सुष्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मितासह तिच्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशाने बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केलं आहे.
आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बॉटलकॅप चॅलेंज पूर्ण केलं आहे. अक्षय कुमारने हॉलिवूड अभिनेता जेसन स्टॅटहॅमहून प्रेरित होऊन हे चॅलेंज स्विकारत व्हिडिओ शेअर केला.
२०१८ मध्ये चर्चेत असणाऱ्या #Kikichallenge मागोमाग सध्या सोशल मीडियावर #BottleCapChallenge चर्चेत आहे. बाटलीचं झाकण एका पायाच्या साहाय्याने उघडण्याचं हे आव्हान आहे. रिव्हर्स किकच्या सहाय्याने, बाटली न पाडता झाकण उघडण्याची किमया दाखवण्याचा प्रयत्न अनेकजण करत आहेत. सध्या हॉलिवूडमध्ये या चॅलेंजची क्रेझ असून आता बॉलिवूड कलाकारही हे चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत.