'किंग खान'ची पत्नी असल्याचा तोटा? गौरी असं काही म्हणाली...

गौरी खान इंटिरियर डिजानर आहे.   

Updated: Jul 5, 2019, 05:01 PM IST
'किंग खान'ची पत्नी असल्याचा तोटा? गौरी असं काही म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूडच्या स्टार कपल्समध्ये शाहरुख खान आणि गौरी खान या जोडीचं नाव अग्रगणी असतं. शाहरुख खान त्याच्या खासगी आयुष्यावर, त्याच्या पत्नीविषयी अधिक बोलताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी गौरी खान पुण्यात पोहचली होती. पुण्यात ग्रॅवितस रत्ना या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. याकार्यक्रमावेळी गौरीने शाहरुखबाबत अतिशय खुलपणाने चर्चा केली आहे. शाहरुखविषयी बोलताना 'शाहरुख केवळ चांगला पिताच नाही तर एक चांगला पती असल्याचंही' तिने यावेळी सांगितलं.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी 'आयएएनएस'शी बोलताना शाहरुखची पत्नी असल्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींवर चर्चा केली. गौरीने 'शाहरुखची पत्नी असल्याने मला मोठी सकारात्मकता आहे. मी शाहरुखमुळे असणाऱ्या सर्व सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देते, नकारात्मक गोष्टींकडे विशेष लक्ष देत नाही. जर काही नकारात्मक गोष्टी असतील तर त्या मी दुर्लक्षित करते.' 

 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

'शाहरुखने गौरी खान डिजाइन्स लॉन्च करण्यासाठी माझी मदत केली आहे. त्यामुळे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे असं अतिशय मजेशीरपणे तिने म्हटलं. मात्र 'जोक्स अ पार्ट' म्हणत गौरीने 'शाहरुखने आमच्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे. तो एक चांगला पिता आणि अतिशय चांगला पतीदेखील आहे. मी शाहरुखची पत्नी असल्याच्या नात्याने माझ्यासाठी अनेक गोष्टी सकारात्मकच आहेत. मी कोणत्याही नकारात्मक गोष्टी शेअर करु इच्छित नसल्याचं' तिने यावेळी बोलताना सांगितलं. 

 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

'मला वाटतं, मी इतर महिलांसारखं सर्वसामान्य, वर्किंग वुमनप्रमाणे आयुष्य जगत आहे. मी स्वत: ठरवते मला कधी लाइमलाईटमध्ये यायचं आहे आणि कधी नाही. ज्यावेळी तुम्हाला तुमचं काम लोकांपर्यंत पोहचवायचं असतं त्यावेळी मीडिया अतिशय महत्त्वाचं काम करत असल्याचंही' गौरीने म्हटलंय. शाहरुख खानची पत्नी गौरी खान इंटिरियर डिजानर आहे.