Sushant Singh Rajput च्या 'फज' कुत्र्याचा व्हिडिओ

व्हिडिओ पाहून व्हाल भावूक 

Updated: Jan 12, 2021, 07:47 AM IST
Sushant Singh Rajput च्या 'फज' कुत्र्याचा व्हिडिओ title=

 मुंबई : गेल्यावर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेकांना धक्का बसला. फक्त देशातच नाही तर परदेशातच ही अभिनेत्याच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करण्यात आली. सुशांतच्या चाहत्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी रडून आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र एक मुकाप्राणी आपलं दुःख कसं व्यक्त करेल?

आजही सुशांतचा फज हा डॉक्टर त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सुशांतकरता फज (Fudge) हा त्याच्या कुटुंबियांपैकीच एक होता. सुशांतच्या मृत्यूनंतर फजचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. सुशांतची भाची मल्लिका सिंह (Mallika Singh) ने फजचा इमोशनल व्हिडिओ इंस्टाग्रामस्टोरीवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून सगळेच भावूक झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sushant Singh Rajput -SSR (@sushantsinghrajput4747)

या व्हिडिओत फज लॉनवर चालताना दिसत आहे. इंस्टाग्राम स्टोरी २४ तासंच राहते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ सुशांतच्या फॅन पेजवर शेअर केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर फजला गृहनगर पटना येथे सुशांतच्या वडिलांच्या घरी नेण्यात आलं. सुशांतचे वडिल आता फजची काळजी घेत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mallika (@_mallika_singh)

१४ जून २०२० रोजी सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यशस्वी अभिनेत्याच्या अशा मृत्यूने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.