सुशांत सिंह राजपूतला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर

सुशांतला मरणोत्तर पुरस्कार दिला जाणार आहे.    

Updated: Aug 29, 2020, 01:21 PM IST
सुशांत सिंह राजपूतला 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर  title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला आता मरणोत्तर  'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर करण्यात आलाआहे.  २०२१ च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात (Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2021) दिला जाणार आहे. मात्र या पुरस्काराची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. 

 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Official Announcement: Sushant Singh Rajput to be honoured at Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2021 #JusticeForSushantSinghRajput #JusticeForSushant #sushantsinghrajput #ssr #sushantsinghrajputfans #warriors4ssr #wearewithyou #dpiff #dpiff2020 #dpiff2021

A post shared by Dadasaheb Phalke Awards -DPIFF (@dpiff_official) on

याआधी त्याचा कॅलिफोर्निया स्टेट असेंबलीकडून (California Legislature Assembly)कडून सन्मान करण्यात आला होता. 

१४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आपला जीवन प्रवास संपवला. त्याच्या मृत्यूला ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आले नाही. 

सुशांत आत्महत्या प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत. याप्रकरणातील अनेक नवे बारकावे समोर येत आहे. सुशांतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावले आहेत.