मुंबई : हृतिक रोशन, मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'सुपर ३०' चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. 'सुपर ३०'ने प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात ७५ कोटी ८५ लाख रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात २४ कोटी ७३ लाख रुपयांचा गल्ला जमवला. आतापर्यंत 'सुपर ३०'ने १०० कोटी ५८ लाख रुपयांचा आकडा पार केला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली. चित्रपटाने मुंबईत सर्वाधिक ३१ कोटी ४९ लाख रुपयांची कमाई केली. त्याशिवाय दिल्लीत २० कोटी ६६ लाख तर पंजाबमध्ये ८ कोटी ७७ लाखांचा गल्ला जमवला.
#Super30 crosses ₹ cr... Grabs a major chunk of market share, despite local and #Hollywood movies proving tough competitors... Biz multiplied rapidly on [second] Sat and Sun... [Week 2] Fri 4.52 cr, Sat 8.53 cr, Sun 11.68 cr. Total: ₹ 100.58 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2019
#Super30 biz at a glance...
Week 1: ₹ 75.85 cr
Weekend 2: ₹ 24.73 cr
Total: ₹ 100.58 cr
India biz.#Super30 growth in biz... Week 2...
Sat [vis-à-vis Fri]: 89.14%
Sun [vis-à-vis Sat]: 36.93 %
India biz.— taran adarsh (@taran_adarsh) July 22, 2019
चित्रपट समिक्षकांसह, प्रेक्षकांकडूनही हृतिकने साकारलेल्या आनंद कुमार यांच्या व्यक्तीरेखेला चांगली पसंती मिळत आहे.
'सुपर ३०'च्या दमदार यशानंतर हृतिक त्याच्या आगामी 'वॉर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'वॉर'मधून टायगर श्रॉफही अॅक्शन सीन साकारताना दिसणार आहे.