सनी लिओनी लुंगी नेसून जेव्हा एका व्यक्तीवर उपचार करते

सनी लिओनी सेटवरील एका व्यक्तीवर उपचार करताना दिसत आहे.

Updated: Jun 1, 2022, 03:33 PM IST
सनी लिओनी लुंगी नेसून जेव्हा एका व्यक्तीवर उपचार करते title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या फनी स्टाइलने लोकांना आश्चर्यचकित करते. कधी सनी सोशल मीडियावर तिच्या सुपर क्यूट आणि मजेदार स्टाईलमध्ये जादू चालवते तर कधी तिच्या विनोदाने चाहत्यांचं मनोरंजन करते. पुन्हा एकदा सनी लिओनीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियाच्या चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री म्हणून दिसत नसून ती एक डॉक्टर सनी लिओनी दिसत आहे. जी स्वत: सेटवरील एका व्यक्तीवर उपचार करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनीची लहान मुलांसारखी क्यूट आणि फनी स्टाइल पाहून तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

सनी लिओनीचा डॉक्टर अवतार पाहून हसू आवराण नाही
चाहत्यांना सनी लिओनीचं सौंदर्य जितके आवडतं तितकीच तिची कॉमिक स्टाईल देखील अधिक आकर्षित करते. खऱ्या आयुष्यात सनी एक फुल-ऑफ लाइफ व्यक्ती आहे जी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधते. अशा परिस्थितीत नुकताच दिसलेला सनी लिओनीचा डॉक्टर अवतार पाहून हसू आवरता येणार नाही.

सनीचे इंस्टाग्राम अकाउंट फनी व्हिडिओंनी भरलेलं आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सनी लिओनीने तिच्या इन्स्टावर एक मजेदार व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी तिच्या मेकअप रूममध्ये आहे. व्हिडिओमध्ये सनी एका व्यक्तीच्या पायावर उपचार करण्यासाठी डॉक्टर अवतारात दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या व्यक्तीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि दुखापतीवर सनी लिक्विडसारखे काही औषध टाकते. ते औषध पडताच त्या व्यक्तीची किंकाळी बाहेर पडते आणि सनी आनंदाने उड्या मारायला लागते. यानंतर सनी म्हणते की, आता ठीक होईल. आता काही करण्याची गरज नाही. कोरडं झाल्यानंतर पट्टी लावायची आहे. एवढंच नाही तर सनी त्या जखमेवर आरशाने हवाही घालते. सनीचा हा डॉक्टर अवतार चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.