मुंबई : बॉलिवूडची 'बेबी डॉल' सनी लिओनी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांना याची माहिती दिली. मात्र, तिच्या चित्रपटाचं शीर्षक काय आहे. याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, सनीने तिच्या फिल्मी करिअरबद्दल नुकतंच सांगितलं. तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे की, 10 वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. कोणताही दिग्दर्शक तिच्यासोबत काम करू इच्छित नसल्यामुळे बॉलिवूडमधील आपला प्रवास खूप कठीण होता. असंही तिने सांगितलं.
एका मुलाखतीत संवाद साधताना सनीने तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी सांगितलं. तिने सांगितलं की, या 10 वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. सनी म्हणाली, ''मला हे काम आवडतं. मला इथे जे काही काम मिळालं त्यात मी आनंदी आहे. इथे अनेक चांगले-वाईट निर्णय घेतले गेले. पण त्या वाईट निर्णयातूनही खूप काही शिकायला मिळालं. हे माझं घर आहे आणि मी येथील प्रत्येक क्षणाचा आनंद घेते.''
निर्माते काम देण्यास टाळाटाळ करतात
रिपोर्टनुसार, सनीने बॉलीवूडमधील तिचे सुरुवातीचे दिवस आठवले आणि सांगितलं की, तिचा बॉलिवूडमधील प्रवास तिच्या भूतकाळामुळे सोपा नव्हता. अनेक चित्रपट निर्माते तिच्यासोबत काम करण्यास इच्छुक नाहीत. जेव्हा मी इथे आले तेव्हा अनेकांना माझ्यासोबत काम करायला आवडलं नाही. आजही अनेक प्रॉडक्शन हाऊस मला काम देऊ इच्छित नसतील. पण मला त्यात काही अडचण नाही. कदाचित भविष्यात मलाही त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल''