मुंबई : बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील हॉट अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोसल मीडियावर सनी नेहमी काहिना काही चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्याचबरोबर, सनी तिच्या प्रोफेशनल लाईफपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात कधीही मागे हटत नाही.
सध्या सनी मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिथून ती सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. दरम्यान, आता सनीने तिचा एक फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. जिथे हजारो चाहते या फोटोला लाईक करत आहेत. त्याचबरोबर काहीजण तिला ट्रोल करतानाही दिसत आहेत. सनीच्या या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे. या शर्टच्या पुढच्या बाजूला एका मुलाचं चित्र आहे. आहे ज्याचे पाय खाली लटकलेले दिसत आहेत.
सनीने या शर्टसोबत पँट घातली नाही. या लूकमध्ये सनीने फक्त शर्ट परिधान केला आहे. सनी या फोटोत समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. यासोबतच तिने गॉगल घातला आहे ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक आणखी हॉट झाला आहे. त्याचबरोबर यूजर्स सतत या फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
याआधी सनी लिओनीने तिचे हॉट बिकिनीमध्ये बोल्ड फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये तिची बिकिनी स्टाईल दिसत आहे. सनीने बहुरंगी बिकिनी घातल्याचं फोटोत तुम्ही पाहू शकता. यासोबतच मोठे सनग्लासेसही तिने या लूकला पूर्ण करण्यासाठी वापरले आहेत. एका फोटोत सनी लिओनी समुद्रकिनारी जलपरीसारखी झोपलेली दिसत आहे. त्याचबरोबर, उर्वरित दोन फोटोंमध्ये ती जमिनीवर बसून बोल्ड पोज देताना दिसत आहे. सनी लिओनीची हॉट आणि बोल्ड स्टाईल सगळ्याच फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.