धक्कादायक! सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये मोठा वाद, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ

सोशल मीडियावर पोस्ट ठरते चर्चेचा विषय

Updated: Sep 25, 2022, 03:29 PM IST
धक्कादायक! सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये मोठा वाद, सोशल मीडियावरील पोस्टमुळे एकच खळबळ title=

मुंबई : अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुमीत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. एवढंच नाही तर अनेक वेळा तो त्याचं मत मांडताना दिसतो. आता सुमीत एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. हटके कॅप्शन आणि फोटोसाठी ओळखल्या जाणारा मराठी अभिनेता अमेय वाघसोबत (Amey Wagh) सोशल मीडियावर त्याचा वाद सुरु आहे. त्यामुळे या दोघांमध्ये कोणत्या गोष्टीमुळे वाद सुरु झाला या विषयी सांगितलं आहे. 

आणखी वाचा : 'तू खूप मस्त Kiss...', Vidya Balan नं दिली Pooja Bhatt ला शाबासकी

अमेयनं त्याच्या फेसबूक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमेयनं लिहिलं की, 'जंगलात राघू (सुमीत राघवण) खूप असतात पण वाघ मात्र एकच असतो… याची कृपया नोंद घ्यावी.' एवढंच काय तर त्यानं सुमीतला टॅगही केलं आहे. अमेयनं अचानक केलेल्या या पोस्टमुळे त्या दोघांच्या चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. 

आणखी वाचा : आलियाला हवीत २ मुलं? बाळंतपणाआधीच मुलांचं भाकीत..रणबीरही म्हणतो ट्विन्स..नक्की मामला काय पाहा

अमेयची ही पोस्ट पाहिल्यानंतर सुमीतनं त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 'सर्कशीतल्या वाघाचा फार त्रागा होतोय असं वाटतंय.. कसं ना फक्त आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही याचीही कृपया नोंद घ्यावी,' अशी कमेंट सुमीतनं केली. (Sumeet Raghavn and Amey Wagh got in fight see what they post) 

आणखी वाचा : 'त्याने मला एकट्यात...', मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

Sumeet Raghavn and Amey Wagh got in fight see what they post

आणखी वाचा : Amitabh Bachchan यांची लेक श्वेता बच्चन आर्थिक संकटात?

इतकं झाल्यावर अमेयनं सुमीतच्या या पोस्टवर पुन्हा एकदा उत्तर दिलं. 'वाघ कुठलाही का असेना, शेवटी त्याच्या डरकाळीची दखल घेतलेली दिसतेय,' अशी पोस्ट अमेयनं केली. अमेयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. त्या दोघांच्या पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'राघू ला प्रेक्षक जवळ करतात, वाघापासून लांब पळतात' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आपली धुणी आपापल्या घरात किंवा एकत्र येऊन धुवा रे. इथं तमाशे करून कलाकार म्हणून मिळणारा आदर गमावू नका.' अमेय आणि सुमीतनं ही पोस्ट रागात येऊन केली की यामागे दुसरं कोणतं कारण आहे, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.