Suhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय

Suhana Khan आणि Gauri Khan चे पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले. 

Updated: Jan 1, 2023, 10:41 AM IST
Suhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय title=

New Year Suhana Khan Party With Mother Gauri : 2023 चा आज पहिला दिवस. काल प्रत्येक व्यक्तीनं रात्री 12 वाजण्याची प्रतिक्षा केली आणि नवीन वर्षाचे आनंदानं स्वागत केले. नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सेलेब्ससोबतच सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांमध्ये हा जल्लोष पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रिटींनी तर मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले होते.  या दरम्यान, शाहरुखची (Shahrukh Khan) लाडकी लेक सुहाना खाननं (Suhana Khan)  तिची आई गौरी खान (Gauri Khan) आणि मित्रांसोबत नवीन वर्षाचे स्वातग केले आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

सुहाना आणि गौरी खानचे हे फोटो सोशल मीडियावर त्यांच्या फॅन क्लबनं शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना तिच्या काही फ्रेंड्ससोबत दिसत आहे. तर यावेळी  त्यांच्यासोबत गौरी देखील आहे. सुहानानं राखाडी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तर गौरीनं निळ्या रंगाचा एक ओव्हर साईज शर्ट परिधान केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये सुहाना तिच्या कुटुंबातील काही लोकांसोबत दिसत आहे. तर सुहानासोबत तिनी आजी पाहायला मिळत आहे. सुहाना आणि गौरी यंदाचे हे वर्ष दुबईत साजरा करत आहेत. सुहाना आणि गौरीसोबत दुबईत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गौरीचा भाई विक्रांत छिब्बर त्याच्या कुटुंबासोबत दिसला. (Suhana And Gauri Khan's Photo Viral) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ख्रिसमसच्या दिवशी, सुहाना तिच्या द आर्चीजचा सहकलाकार अगस्त्य नंदा तसेच त्याची बहीण नव्या नवेली नंदा आणि आई श्वेता बच्चन यांच्यासोबत मुंबईत कपूर कुटुंबाच्या लंचला पोहोचताना दिसली. सुहाना आणि अगस्त्यनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर नव्या आणि श्वेता यांनी पांढरे कपडे परिधान केले होते. सुहाना आणि अगस्त्य लवकरच झोया अख्तरच्या नेटफ्लिक्स चित्रपट 'द आर्चीज'मधून (The Archies) अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

Suhana khan celebrate New Year with mother gauri and family friends photo viral

अलीकडेच सुहाना आणि अगस्त्य झोयाच्या मुंबईतील घरी स्पॉट झाले होते. यापूर्वी 'द आर्चीज' च्या टीमनं मुंबईत चित्रपटाच्या रॅप पार्टीला हजेरी लावली होती. या चित्रपटातून खुशी कपूर देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 'द आर्ची' या कॉमिक्सचे हिंदी व्हर्जन असणार आहे.

हेही वाचा : गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा

Suhana khan celebrate New Year with mother gauri and family friends photo viral

या चित्रपटातून एकावेळी तीन स्टार किड्स म्हणजेच सुहाना, अगस्त्य आणि खुशी  कपूर (Khushi Kapoor)  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. अगस्त्य (Agastya Nanda) हा श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे. तर खुशी ही दिग्दर्शक बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी लेक आहे.