सुहाना खानच्या एका ड्रेसची किंमत माहित आहे? लक्झरी कार विकत घ्याल

Suhana Khan: सुहाना खान हिच्या लुकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सध्या तिच्या एका लुकची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या ड्रेसची किंमत पाहून तुमचेही डोळे मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 9, 2023, 07:23 PM IST
सुहाना खानच्या एका ड्रेसची किंमत माहित आहे? लक्झरी कार विकत घ्याल title=
suhana khan black dress price will shock you jio world plaza

Suhana Khan: अभिनेत्री सुहाना खानची अनेकदा चर्चा रंगलेली असते. सध्या तिचा 'द आर्चिज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र तिचीच चर्चा आहे. यावेळी एका कार्यक्रमानिमित्त तिनं परिधान केलेला ड्रेस हा फारच महागडा होता. त्यामुळे तिच्या ड्रेसची जोरदार चर्चा होती. तिनं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्याची चांगलीच चर्चा होती. सोबतच तिनं कॅरी केलेली पर्सही फार महाग होती. यावेळी तिनं जो ड्रेस परिधान केली होता त्याची किंमत चक्क 44 लाखांची होती. तिनं यावेळी कोर्सेट आणि स्कर्ट परिधान केला होता. जो काळ्या रंगाचा होता. यावेळी तिनं स्ट्रॅपलेस कोर्सेट घातला होता. 

1 नोव्हेंबर रोजी जिओ वर्ल्ड प्लाझा या शॉपिंग सेंटरचे उद्धाटन झाले होते. त्यावेळी अनेक नामवंत सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी सुहाना खानच्या लुकनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. सध्या तिच्या ड्रेसच्या किमतीची जोरात चर्चा आहे. तुम्हाला कल्पना होणार नाही परंतु या ड्रेसची किंमत ही फारच मोठी आहे. इतक्या पैशांमध्ये तर तुम्ही लोनवर घरही घेऊ शकता. या तिच्या ड्रेससोबत तिच्या एअररिंग्स आणि सॅण्डल्सचीही चर्चा रंगलेली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष हे तिच्याकडे वेधले होते. Rhycni या ब्रॅण्डचा तिनं कोर्सेट परिधान केला होता. त्याखाली तिनं घातलेल्या स्कर्टची किंमत वाचून तर तुमचं डोकंच गरगरायला लागेल. 

या स्कर्टची किंमत आहे 38 हजार रूपये हा एक फॉर्म फिटिंग स्कर्ट होता. ज्याची किंमत ही 44 लाख 67 हजार 533 रूपये इतकी होती. त्याचसोबत तिचा हा लुक इतका क्लासी दिसत होता की काही विचारू नका. आज तकनं दिलेल्या रिपोर्टनुसार या ड्रेसची किंमत इतकी आहे असं कळतं आहे. या लुकसोबतच तिनं लेडी डायर मायक्रो बॅक कॅरी केली होती ज्याची किंमत ही 3900 डॉलर म्हणजे 3.24 लाख इतकी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुहाना खान आता लवकरत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिचा 'द आर्चिज' हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे त्याची जोरात आहे. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट हे लाईन्ड अप आहेत. शाहरूख खानसोबतही ती डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. यावेळी तिच्या इयररिंग्सनंही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी याची किंमत ही 4,199 इतकी होती.