अभिनेता अक्षय खन्नाची 'अशी' अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का; समोर आले फोटो

अनेक कलाकार आपलं नशिब आजमवण्यासाठी त्यांच्या स्वप्ननगरीत येतात. यामधलंच एक नाव म्हणजे  अभिनेता अक्षय खन्ना. मात्र गेले अनेक वर्ष हा अभिनेता सिनेसृष्टीपासून दूर आहे. एकेकाळी एकापेक्षा एक हिट सिनेमा देणारा अक्षय खन्ना का सिनेमापासून लांब आहे. 

Updated: Jan 10, 2024, 02:46 PM IST
अभिनेता अक्षय खन्नाची 'अशी' अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का; समोर आले फोटो title=

मुंबई : अनेक कलाकार आपलं नशिब आजमवण्यासाठी त्यांच्या स्वप्ननगरीत येतात. यामधलंच एक नाव म्हणजे  अभिनेता अक्षय खन्ना. मात्र गेले अनेक वर्ष हा अभिनेता सिनेसृष्टीपासून दूर आहे. एकेकाळी एकापेक्षा एक हिट सिनेमा देणारा अक्षय खन्ना का सिनेमापासून लांब आहे. 'ताल' सिनेमात ऐश्वर्या रायसोबत अक्षय खन्नाची जोडी लोकांनी खूप पसंत केली होती. मात्र त्यावेळी उंचीच्या शिखरावर असलेला अभिनेता गेला बराच काळ सिने इंडस्ट्रीमधून गायब आहे. अक्षय खन्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 

समोर आलेल्या फोटोत अक्षय खन्नाचा बदलेला लूक पाहून त्याचे फॅन्स खूप हैराण होत आहे. ताल सिनेमात ऐश्वर्या रायसोबत अक्षय खन्नाच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती. मात्र सध्या सोशल मीडियावर अक्षय खन्नाच्या लेटेस्ट समोर आलेले फोटो पाहून युजर्स त्याला विचारत आहेत की, नक्की त्याला झालं काय आहे. 

अक्षय खन्नाची हालत पाहून युजर्स विचारतायेत प्रश्न
अक्षय खन्नाचे जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते पाहून लोकं त्याला विचारत आहेत की, त्याला नक्की काय झालंय. याचबरोबर अनेकजण त्याला स्कूल डेजच्या वेळचा फेवरेट हिरोदेखील म्हणत आहेत. तर काहीजण त्याची ही हालत पाहून हैराणही होत आहेत. तर अनेकांनी त्याला हेअर ट्रांसप्लांट करण्याचा सल्ला देखील दिला आहे. 

सिनेसृष्टीपासून दूर आहे अभिनेता
बॉलिवूड सुपरस्टार विनोद खन्नाचा मुलगा अक्षय खन्नाने पंकज पराशर याच्या रोमांटिक ड्रामा फिल्म 'हिमालय पुत्र' सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमात त्याचे वडिल विनोद खन्नादेखील होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. अक्षय खन्ना 'दिल चाहता है', 'हंगामा', 'हलचल', 'आ अब लौट चलें', 'बॉर्डर', 'ताल' आणि 'हमराज' सारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. मोठ्या पडद्यावर उत्तम अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवणारा अक्षय कुमार बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. 

ऐश्वर्यासोबत जोडलं गेलंय नाव
२०१६मध्ये अक्षयचं ढिशूम सिनेमात झळकला होता. अक्षय त्याच्या प्रोफेशनल लाइफमध्ये चित्रपटाच्या ट्रॅकपासून जवळजवळ बाहेर पडला आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याने लग्नही केलं नाही. मात्र, अक्षयचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. मीडिया रिपोर्टसव विश्वास ठेवायचा झाला तर, ऐश्वर्यासोबत अक्षयची जवळिकता वाढू लागली होती असं म्हटलं जातं. 

असंही म्हटलं जातं की, 'आ अब लौट चलें'मध्ये हे दोघं एकत्र काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. असंही म्हटलं जात की, जेव्हा 'हम दिल दे चुके सनम' दरम्यान सलमान खानने ऐश्वर्याच्या आयुष्यात एन्ट्री घेतली त्यानंतर अक्षय आणि ऐश्वर्या वेगळे झाले.  याचबरोबर ऐश्वर्या बरोबरच अक्षय खन्नाचं नाव करिश्मा कपूरशीही जोडलं जातं. एवढंच नव्हेतर त्यांची चर्चा लग्नापर्यंतही पोहचली होती. मात्र अभिनेत्रीची आई बबिता यांच्यामुळे त्यांचं नातं तुटलं.