स्टंट आणि मार्शल आर्टही... पण विद्युतला 'बॉक्स ऑफिस' देतंय हूल

संजय दत्तचा गॅंगस्टर अंदाज असलेल्या 'वास्तव' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये विद्युत संजय दत्तची जागा घेणार आहे

Updated: Jul 3, 2019, 11:40 PM IST
स्टंट आणि मार्शल आर्टही... पण विद्युतला 'बॉक्स ऑफिस' देतंय हूल title=

प्रेरणा कोरगांवकर, झी २४ तास, मुंबई : बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल लवकरच कमांडो सिरीजचा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विद्युतच्या दमदार अंदाजावर जरी चाहते फिदा असले तरी बॉक्स ऑफिसवर विद्युतचे चित्रपट अपेक्षित व्यवसाय करताना दिसत नाहीत. बी-टाऊनचा एक असा अभिनेता ज्याच्या चित्रपटांमध्ये दमदार ऍक्शन आणि स्टंट प्रेक्षकांना भावते. विद्युत जामवालनं तामिळ चित्रपटसृष्टीत 'बिल्ला २' या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री घेतली. कमांडो चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल टाकत त्याने रसिकांच्या काळजात स्थान मिळवलं. विद्युत जामवालच्या मार्शल आर्टसची बी-टाऊनला ओळख झाली ती त्याच्या 'कमांडो' चित्रपटामुळेच...

Image result for vidyut jamwal commando
विद्युत जामवाल - कमांडो

विद्युतच्या कॅप्टन करणवीर सिंग या भूमिकेला जणू प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं... पण 'कमांडो' आणि 'कमांडो २' हे  विद्युतचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करु शकले नाहीत. 

तर नुकत्याचं प्रदर्शित झालेल्या 'जंगली' चित्रपटाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. 'जंगली' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर आणि विद्युतचा तितकाच दमदार ऍक्शन अंदाज खरंतर प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरला होता. मात्र या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर सपाटून मार खाल्ला.

Image result for vidyut jamwal dna
विद्युत जामवाल - जंगली

विद्युतचे चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर २०० -३०० कोटींचा आकडा पार करत नसले तरी त्याच्या अभिनयावर, ऍक्शनवर, बिनधास्त अंदाजावर चाहते फिदा आहेत.

'वास्तव'च्या सिक्वलमध्ये विद्युत

म्हणूनच की काय मराठी अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर विद्युत जामवालसोबत 'वास्तव' चित्रपटाचा सिक्वल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. संजय दत्तचा गॅंगस्टर अंदाज असलेल्या 'वास्तव' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये विद्युत संजय दत्तची जागा घेणार आहे.
अभिनेत्री श्रुती हसन विद्युतसोबत या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे तर आगामी 'कमांडो ३' साठीदेखील विद्युत खास मेहनत घेताना दिसतोय.

Image result for vidyut jamwal
विद्युत जामवाल

त्यामुळे विद्युतचे आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटींचा आकडा पार करणार की, पुन्हा एकदा विद्युतला चित्रपट रसिक झटका देणार का? हे पाहणं रंजक ठरेल.