दारूच्या व्यसनामुळे 'या' अभिनेत्रीला गमवावा लागला जीव...

 प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज वाढदिवस...

Updated: Aug 1, 2019, 07:14 PM IST
दारूच्या व्यसनामुळे 'या' अभिनेत्रीला गमवावा लागला  जीव... title=

मुंबई :  बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या गझल आणि शायरीने प्रेक्षक त्या काळाला भारावून टाकले होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी मुंबईमध्ये दादरला झाला. मात्र फार कमी वयात त्यांनी या जगातून निरोपही घेतला. मीना कुमारी यांच खर नाव महजबीं बानो असं होतं. जेव्हा मीना कुमारी यांचा जन्म झाला होता, तेव्हा वडील म्हणजेच अली बख्श आणि आई इकबाल बेगम यांच्याकडे डॉक्टरांना देण्याकरीता पैसे सुद्धा नव्हते. 

त्यानंतर मीना कुमारी यांच्या आई आणि वडीलांनी त्यावेळी ठरविले होते की, या मुलीला मुस्लिम आश्रमात देऊन टाकाचे, मात्र निशिबाला तर वेगळाच खेळ मान्य होता. मीना कुमारीच्या आयुष्यात वेगळंच घडलं. म्हणूनच की काय? मीना कुमारी यांना बॉलिवूडची ट्रेजडी क्वीन म्हणून सुद्धा त्यांना संबोधल्या जात असत. 

साठच्या दशकात त्यांच नाव प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये घेतल्या जात होतं. त्याकाळात मीना कुमारी या स्वत: गझल आणि गाणे लिहत असत. त्यांची एक गझल लोकप्रिय आहे. 'चांद तनहा है, आसमां तन्हा, दिल मिला है कहां-कहां तनहा...बुझ गई आस, छुप गया तारा' या माध्यमातून त्यांनी त्यांचे आयुष्य रेखाटलं होत. 

मीना कुमारी यांच वैवाहिक आयुष्य फार वादग्रस्त राहिलं. मीना कुमारीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात तिहेरी तलाकचं दु:ख सुद्धा सहन करावं लागलं होतं, असं म्हटलं जातं होतं की, मीना कुमारी यांचे पती कमाल अमरोही यांनी रागाच्या भरात मीना कुमारींना तीन वेळा तलाक म्हटलं आणि मग पश्तात्ताप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काही उरलं नव्हतं.

मीना कुमारी यांच करियर : 

मीना कुमारी या ७ वर्षाच्या असतांन पासून त्यांनी कामाची सुरूवात केली होती. मीना कुमारी यांच बॉलिवूडमध्ये पदार्पण 'ए हिंद' या चित्रपटाद्वारे झालं होतं. त्यानंतर खरी प्रसिद्ध त्यांना 'बैजू बावरा' या चित्रपटाद्वारे मिळाली. हा चित्रपट १९५२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. 

यानंतर मीना कुमारी यांनी त्यांच्या करियरमध्ये कधीच मागे वळून बघितलच नाही. १९५१ या साली 'तमाशा' चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट पती कमाल अमरोही यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये फार जवळीकता वाढली आणि नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कमाल अमरोही यांच्याशी मीना कुमारी विभक्त झाल्यानंतर त्यांना अभिनेता धर्मेंद्र यांच्याशी प्रेम झाले.

काही लोकांच्या मतानुसार धर्मेंद्र यांना बॉलिवूमध्ये आणण्याचं श्रेय, हे मीना कुमारी यांना जाते. मीना कुमारी आणि धर्मेंद्र नात ३ वर्षापर्यत राहिलं, मात्र त्यानंतर दोघे वेगळे झाले.

मद्यप्राशनाच्या अति सेवनाने घेतला जीव :

अनेकजणाच्या म्हणण्यानुसार मीना कुमारी यांना मद्यप्राशणाची खूप सवय लागली होती. याकाळात त्यांना फार एकटे देखील वाटत होते. दिवस रात्र मद्याच्या आहारी गेल्याने,  लिवर सिरोसिस आजारानं त्यांना वेढलं. त्यानंतर त्या चांगल्या झाल्या, मात्र अचानक ३१ मार्च १९७२ रोजी त्यांच निधन झालं. त्यावेळी त्या, फक्त ३९ वर्षाच्या होत्या.