मुंबई : एकीकडे कलाविश्वात अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. नुकतीच र तर गेल्या दिवसांत अशा अनेक धक्कादायक बातम्या कलाविश्वातून येत आहेत. आधी सामंथा नागा चैतन्याची त्यानंतर आमिर खान किरण रावच्या घटस्फोटाची बातमी अचानक समोर येवून अनेकांना धक्का बसला आता या यादीत अजून एका जोडीचा सामावेश होतोय. आता या यादीत भिनेता अभिषेक मलिक समाविष्ट झाला आहे. अभिनेता अभिषेक मलिकचं लग्नही कायमचं संपुष्टात येत आहे. या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एक्सक्लूसिव रिपोर्टनुसार, 'भाग्यलक्ष्मी' फेम अभिषेक मलिकची पत्नी सुहानी चौधरीची पर्सनल लाईफ गेल्या अनेक दिवसांपासून ठिक चालत नाहीये. आता हे कपल घटस्फोट घेत आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्याने त्याच्या घटस्फोटाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. याविषयी बोलताना अभिनेता म्हणाला, ''होय, हे खरं आहे की, सुहानी आणि मी वेगळे होत आहोत आणि आयुष्यात पुढे जात आहोत. आमच्या वैवाहिक जीवनात कम्पॅटिबिलिटी आणि समंजसपणा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे. आमच्यात कटुता नाही. आम्ही केवळ एकमेकांना सगळं चांगलं होण्यासाठी शुभेच्छा देतो.''
'आमच्यात मतभेद'
सुहानी चौधरीने याविषयी बोलताना सांगितलं की, 'आमच्यात मतभेद आहेत. हे आम्हाला तेव्हा समजलं, जेव्हा आम्ही एकत्र राहणं सुरु केलं. मात्र याबाबत आम्हाला कसलाच पश्चाताप किंवा तक्रार नाही. आम्ही दोघांनीही आपआपल्या आयुष्यात आता पुढे जायला हवं याची आम्हाला जाणीव झाली आहे. घटस्फोट घेणं हा आमचा कदाचित योग्य निर्णय आहे. मी अभिषेकला त्याच्या पुढील आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते.
अभिषेक आणि सुहानीने ऑक्टोबर 2021 साली लग्नगाठ बांधली. या दोघांचा शाही विवाहसोहळा दिल्ली येथे पार पडला होता. आता या दोघांनीही सोशल मीडियावरुन या दोघांच्या लग्नाचे फोटो काढून टाकले आहेत. अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता आत्तापर्यंत अभिषेकच्या टीव्ही शोबद्दल सांगायचे तर, तो छल - 'शाह और मत', 'दिल की नजर से बहुत खूबसूरत', 'प्यार तूने क्या किया', 'भाग्यलक्ष्मी', 'ये है मोहब्बतें', 'पिंजरा बहुतसुरती का' मध्ये दिसला आहे.