सुशांतच्या चाहत्याने रजिस्टर केली एक चांदणी; दिलं 'हे' नाव

सर्टिफिकेट व्हायरल 

Updated: Jul 5, 2020, 08:13 PM IST
सुशांतच्या चाहत्याने रजिस्टर केली एक चांदणी; दिलं 'हे' नाव title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतला जाऊन २१ दिवस झाले आहेत मात्र अजूनही त्यांचे चाहते त्याला विसरलेले नाहीत. सुशांतने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

असं सांगितलं जातंय की, सुशांत गेल्या ६ महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. सुशांतचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून पोस्ट आणि फोटोज शेअर करत आहेत. अशाच एका त्याच्या चाहत्याने एक ट्विटकरून खूप खास माहिती शेअर केली आहे. 

त्याने सुशांतच्या नावाची एक चांदणी रजिस्टर केली आहे. सुशांतच्या या चाहतीचं रक्षा नावाच अकाऊंट आहे. हे अकाऊंट युनायटेड स्टेटमधील असून त्याने ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

सुशांत कायमच चांदण्याचा चाहता राहिला आहे. त्यामुळे एका चांदणीला त्याच नाव देणं मला योग्य वाटलं. याचं योग्य असं सर्टिफिकेशन शेअर केलं आहे. चाहत्याने शेअर केलेल्या या सर्टिफिकेटचं सत्यता झी न्यूज पडताळत नाही. त्यांनी शेअर केलेली ही गोष्ट आहे. 

सुशांतच्या चाहत्यांच त्यावरील प्रेम काही कमी होत नाही. लवकरच सुशांतचा शेवटचा ठरलेला सिनेमा 'दिल बेचारा'चा ट्रेलर रिलीज होणार आहे.