लाल रंगाच्या ड्रेसमधली ही क्यूट मुलगी आज आहे बॉलीवूडची स्टार अभिनेत्री, तुम्ही हिला ओळखलंत का?

नर्गिस फाखरीने तिच्या आयुष्यातील कठीण काळ तिच्या चाहत्यांसह आणि सोशल मीडिया फॉलोअर्ससोबत इतक्या स्पष्टपणे शेअर केला जे पाहून तिच्या या धाडसाचे कौतुक केले होते. आजही नर्गिसला खूप अभिमान आहे की ती अशा परिस्थितीतून येऊनही ती आज अभिमानानं उभी आहे. 

Updated: Oct 20, 2022, 09:08 PM IST
लाल रंगाच्या ड्रेसमधली ही क्यूट मुलगी आज आहे बॉलीवूडची स्टार अभिनेत्री, तुम्ही हिला ओळखलंत का?  title=

Nargis Fakhri Childhood Photos: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयानं आणि आपल्या निखळ सौंदर्यांनं अख्ख्या बॉलीवूडला मोहवून टाकणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhari) आज बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्ये आपलं नाव कमावून आहे. नर्गिस फाखरी अमेरिकेत भारतात आली आणि आपल्या अभिनय कौशल्यानं तिनं आपल्या चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. लहाणपणापासून चांगल्या परिस्थितीतून ती गेली असली तरी अनेकदा आर्थिक परिस्थितीचाही तिला सामना करावा लागला आहे असं तिनं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. नर्गिसचं नावं रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor Affairs) सोडलं गेलं होतं. जेव्हा तिनं 2011 मध्ये रॉकस्टार (Rockstar Songs) या चित्रपटात काम केलं होतं. आज नर्गिस फाखरीचा वाढदिवस आहे. नर्गिस फाखरी ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने 'रॉकस्टार', 'मद्रास कॅफे' (Madras Cafe), 'डिशूम', ;बॅन्जो' आणि अशा इतर लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. (star bollywood actress nargis fakhri childhood photo in red dress did you see)

मध्यंतरी तिनं आपला लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये एक भावनिक पोस्टही लिहिली होती. (Nargis Fakhari Post) आपल्या लहानपणींच्या अनुभवांविषयी तिनं यात लिहिलं होतं. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

फोटो शेअर करताना नर्गिसने (Instagram Post) लिहिले होते, "हा फोटो म्हणजे माझ्या आयुष्यातील एक छोटासा भाग आहे जो मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते आहे. हे माझं कुटुंब आहे. चित्रपटांमध्ये आपलं नावं वाढणं सोपं नव्हतं. त्याचबरोबर आमच्या आयुष्यातही अनेक कठीण गोष्टी आल्या तरीही आम्ही खचलो नाही. आम्हीही एकेकाळी फार वाईटरीत्या आर्थिक परिस्थितीचा सामना केला आहे. पण आम्ही कायम एकमेकांसाठी होतो. कधी आमच्याकडे खायला अन्नही नव्हते परंतु आम्ही नेहमीच एकमेकांसाठी होतो..."

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

नर्गिस फाखरीने तिच्या आयुष्यातील कठीण काळ तिच्या चाहत्यांसह आणि सोशल मीडिया फॉलोअर्ससोबत इतक्या स्पष्टपणे शेअर केला जे पाहून तिच्या या धाडसाचे कौतुक केले होते. आजही नर्गिसला खूप अभिमान आहे की ती अशा परिस्थितीतून येऊनही ती आज अभिमानानं उभी आहे. 

नर्गिस फाखरी शेवटची 2019 च्या अमावस चित्रपटात दिसली होती. तिचा आगामी चित्रपट तोरबाज (Torbaaz) हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे, ज्यामध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) आणि राहुल देव देखील आहेत.