SSR Death Anniversary: सुशांत - अंकिताचा हा रोमांटिक व्हिडीओ तुम्हीही पाहिला नसेल

अभिनेत्याच्या निधनानंतर का व्हायरल होतोय हा व्हिडीओ? पाहा त्या व्हिडीओमध्ये नक्की आहे तरी काय?   

Updated: Jun 14, 2022, 10:48 AM IST
SSR Death Anniversary: सुशांत - अंकिताचा हा रोमांटिक व्हिडीओ तुम्हीही पाहिला नसेल  title=

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर चाहते आजही त्याला विसरू शकलेले नाहीत. अभिनेत्याच्या निधनाला 2 वर्षे झाली आहेत. अशा परिस्थितीत सुशांतच्या आठवणी चाहत्यांच्या हृदयात आजही जिवंत आहेत. आज  सुशांत आपल्यात नसला तरी त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

आता व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 'पवित्र रिश्ता' मालिकेतील आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि सुशांत एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. एकमेकांच्या प्रेमात हरवलेल्या अंकिता आणि सुशांत हे गाणं कधीचं प्रदर्शित झालं नाही. 

पण आज मात्र हे गाणं तुफान व्हायरल होत आहे.  झी म्यूझीक कंपनीने त्याचा कधीही न प्रदर्शित झालेला व्हिडिओ यूट्यूब वर शेअर केला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला.

 सुशांतच्या आत्महत्तेनंतर सतत त्याचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड आंकितासोबत असलेले त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आहेत. 

त्याला करण देखील तसचं आहे. अंकिता आणि सुशांतने 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. प्रेक्षकांनी या जोडीला तुफान डोक्यावर घेतलं.