SSR Case : श्रुती मोदीकडून धक्कादायक खुलासा; सुशांतभोवती....

याचा विचाही केला नसेल, पण....   

Updated: Sep 3, 2020, 03:00 PM IST
SSR Case : श्रुती मोदीकडून धक्कादायक खुलासा; सुशांतभोवती.... title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आत्महत्या प्रकरणानं कलाविश्व हादरलं. कलाविश्वाला आणखी हादरे मिळण्याचं सत्र सध्या सुरुच आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे सीबीआयकडून सुरु असणाऱा सुशांत आत्महत्या प्रकरणीचा तपास. 

सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यापासून त्याच्या घरात काम करणारे कर्मचारी, त्याच्या संपर्कातील व्यक्ती किंबहुना त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांचीसुद्धा सीबीआयनं चौकशी केली आहे. यातच आता ड्रग्ज कनेक्शनही समोर आल्यामुळं सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. याचविषयी सुशांतची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या श्रुती मोदी हिनं काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामध्ये तिनं सुशांतसह काम करणारे बरेच लोक ड्रग्जच्या आहारी केले होते. किंबहुना त्याच्या घरीसुद्धा ड्रग्जचा वापर केला जात असल्याचा दावा तिनं केला आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सुशांतच्या जीवनशैलीमध्ये ड्रग्ज होते हे खरं. आपण फक्त सुशांतचं काम करायचो आपला अंमली पदार्थांशी काहीही संबंध नाही अशी कबुली तिनं दिली सीबीआयकडे दिल्याचं कळत आहे. इतकंच नव्हे, तर सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे काही कर्मचारी ड्रग्जच्या आहारी गेले होते. सुशांतलाही यामध्ये बळजबरीनं सहभागी होण्यास सांगितलं जात असे असा गौप्यस्फोट तिनं केला आहे. 

 

सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतनं २०२० च्या मार्च महिन्यामध्ये श्रुतीकडे रियाकडून करण्यात आलेल्या खर्चाचे बँक स्टेटमेंट मागवले होते. ज्याबाबत श्रुतीनं सुशांतला स्टेटमेंट देण्यापूर्वी रियाला याबाबतची माहिती दिली. ज्यानंतर रिया घरी येताच हे प्रकरण शांत झालं होतं. संबंधित प्रकरणाबाबतही सीबीआयनं श्रुतीकडे चौकशी केल्याचं कळत आहे. श्रुतीनं केलेले हे खुलासे पाहता पुन्हा एकदा सुशांत आत्महत्या प्रकरणी तपासानं वेगळी दिशा घेतल्याचं स्पष्ट होत आहे.