मुंबई : श्रीदेवीचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीजवळ पोहोचलं....थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होणार....
02:25 PM
मुंबई : विलेपार्ले स्मशानभूमीच्या दिशेने अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मार्गस्थ, चाहत्यांची अलोट गर्दी
02:20 PM
मुंबई : श्रीदेवी यांना अखेरचा निरोप, दिली मानवंदना
#WATCH Mumbai: Mortal remains of #Sridevi wrapped in tricolour, accorded state honours. pic.twitter.com/jhvC9pjLMp
— ANI (@ANI) February 28, 2018
Mumbai: Mortal remains of #Sridevi to be cremated with state honours. pic.twitter.com/OC64HUt2rv
— ANI (@ANI) February 28, 2018
02:10 PM
मुंबई : श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, बॉलिवूडसह चाहत्यांची अलोट गर्दी, सुरक्षा व्यवस्थेवर ताण
Mumbai: Mortal remains of #Sridevi being taken for cremation pic.twitter.com/iHwov0Z5FG
— ANI (@ANI) February 28, 2018
01:10 PM
मुंबई : अलोटगर्दीमुळे पोलिसांवर ताण
01:10 PM
मुंबई : अभिनेत्री रेखा, अभिनेता विवेक ओबेरॉय, राजकुमार राव आणि डिंपल कपाडिया यांनीही श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली
12:40 PM
मुंबई : अंत्यदर्शनासाठी उरले अवघे काही क्षण; शासकीय इतमामात श्रीदेवी यांच्यावर होणार अंत्यसंस्कार, मुंबई पोलिस बँड, लोखंडवाला येथील सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल
Mumbai: #Sridevi to be cremated with state honours, Mumbai Police band reaches Celebration Sports Club. pic.twitter.com/GnAWgEPlIY
— ANI (@ANI) February 28, 2018
11:40 AM
मुंबई : जावेद अख्तर, शबाना आझमी, रवीना टंडन आणि मलायका अरोरा हे कलाकार मंडळीसुद्धा श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले.
11:30 AM
चैन्नई : तामिळनाडू येथील शालेय विद्यार्थ्यांनी श्रीदेवीला श्रद्धांजली वाहली
Students of primary school owned by family of #Sridevi paid tributes to the actress in Sivakasi #TamilNadu pic.twitter.com/teMSl4cJLD
— ANI (@ANI) February 28, 2018
मुंबई : जॅकलीन फर्नांडिस, काजोल, अजय देवगण श्रद्धांजली वाहण्यासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल
Jacqueline Fernandez, Kajol & Ajay Devgn arrive at #Mumbai's Celebration Sports Club #Sridevi pic.twitter.com/wWY9jr8Xms
— ANI (@ANI) February 28, 2018
11:11 AM
मुंबई : सरोज खान, जया बच्चन आणि माधुरी दीक्षित श्रद्धांजली वाहण्यासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल
Choreographer Saroj Khan, actress Jaya Bachchan & Madhuri Dixit arrive at #Mumbai's Celebration Sports Club #Sridevi pic.twitter.com/hrKbHT3G4e
— ANI (@ANI) February 28, 2018
10:50 AM
मुंबई : श्रीदेवी यांचे पार्थिव सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये आणल्यानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेत्री सुष्मिता सेन, ऐश्वर्या राय-बच्चन दाखल
Sushmita Sen and Aishwarya Rai arrive at #Mumbai's Celebration Sports Club to pay last respects to #Sridevi. pic.twitter.com/7NBWba9OJP
— ANI (@ANI) February 28, 2018
10:19 AM
अभिनेत्री हेमा मालिनी, इशा देओल सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल
Hema Malini and Isha Deol arrive at Celebration Sports Club to pay last respects to #Sridevi pic.twitter.com/MZnuU1rfKI
— ANI (@ANI) February 28, 2018
10:18 AM
कपूर सदस्यांपैकी संजय कपूर आणि रेखा कपूर, हर्षवर्धन कपूर सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये दाखल
Family members Sanjay Kapoor and Rhea Kapoor & Harshvardhan Kapoor arrive at Celebration Sports Club. #Sridevi pic.twitter.com/WipsFpbwO1
— ANI (@ANI) February 28, 2018
10:07 AM
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये आणल्यानंतर चाहत्यांची अलोट गर्दी,
Mumbai: People queue up outside Celebration Sports Club to pay tributes to #Sridevi. pic.twitter.com/FM7gJIkMb3
— ANI (@ANI) February 28, 2018
10:05 AM
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजासुद्धा श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले
Mumbai: Filmmaker Farah Khan & actor Sonam Kapoor arrive at Celebration Sports Club. #Sridevi pic.twitter.com/4y5TrQfePK
— ANI (@ANI) February 28, 2018
09:55 AM
श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आदित्य ठाकरे सेलिब्रेशन स्पोर्स्ट्स क्लबमध्ये दाखल.
09:55 AM
अभिनेता अरबाज खान, फराह खान, उर्वशी रौतेलासुद्धा श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल
Actor Arbaz Khan arrives at Celebration Sports Club in Mumbai to pay last respects to #Sridevi, funeral to take place later today. pic.twitter.com/Mqz1FlkdGo
— ANI (@ANI) February 28, 2018
09:54 AM
कपूर कुटुंबातील काही सदस्य सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबच्या दिशेने रवाना.
Mumbai: #Sridevi's mortal brought to Celebration Sports Club, where people will pay their last respects to the actor, funeral to take place later today. pic.twitter.com/Gip77pgV0l
— ANI (@ANI) February 28, 2018
09:50 AM
स्पोर्ट्स क्लबमध्ये होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
09:22 AM
मुंबई : श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त तैनात
Visuals from #Mumbai's Celebration Sports Club, where #Sridevi's mortal remains will be kept for people to pay tributes. Heavy security deployed. pic.twitter.com/jh895m1Frt
— ANI (@ANI) February 28, 2018
09:22 AM
मुंबई : श्रीदेवी यांचे लंडन, अमेरिका, हैदराबाद, बंगळुरु, राजस्थान, दिल्ली येथील चाहते मुंबईत दाखल, श्रीदेवी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी
08:20 AM
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्य़संस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी अंधेरीतील सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब येथून अत्यंयात्रा निघणार असल्याने चाहतेही गर्दी करु लागलेत.
सकाळी ९.३० ते १२.३० अंत्यदर्शन – सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लब, गार्डन नंबर ५, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे.
दुपारी २.०० अंत्ययात्रा – सेलिब्रेशन स्पोटस् क्लब ते विलेपार्ले येथील सेवा समाज हिंदू स्मशानभूमी
दुपारी ३.३० विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
श्रीदेवीला पांढरा रंग खूप आवडायचा. त्यामुळे तिच्या इच्छेनुसार अखेरचा निरोप देण्यासाठी पांढरा रंगाचा वापर करण्यात येणार आहे. ‘मला अखेरचा निरोप द्याल तेव्हा सर्व काही पांढऱ्या शुभ्ररंगाचे असावे’ अशी अभिनेत्री श्रीदेवी हिची शेवटची इच्छा होती. तिच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी प्रत्येक वस्तू ही पांढऱ्या रंगाची असेल याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे तिच्या अंत्ययात्रेसाठी पांढऱ्या रंगाची फुले आणली गेलीत.
मुंबई : दुबईत निधन झालेल्या अभिनेत्री श्रीदेवीचं पार्थिव रात्री मुंबईत दाखल झाले. आज सकाळी साडे नऊ ते साडे बारा पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी साडे तीन वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
दरम्यान, झी समूहाचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनीही रात्री उशिरा श्रीदेवीच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं, श्रीदेवीच्या चेहऱ्याकडे पहिल्यावर ती कुठल्याही क्षणी उठून आपल्याशी बोलेल असं वाटतंय, अशी भावूक प्रतिक्रिया आदरांजलीनंतर डॉ. चंद्रा यांनी दिली.
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी अंधेरीतील सेलिब्रेशन स्पोर्टस क्लब येथून अत्यंयात्रा निघणार असल्याने चाहतेही गर्दी करु लागलेत. श्रीदेवीचा पार्थिव मुंबईत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी साडे नऊ ते साडे बारा यावेळात अंधेरीतल्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये चाहत्यांना तिचं अंतिम दर्शन घेता येणार आहे.
Mumbai: #Sridevi's mortal remains being taken to her Lokhandwala residence pic.twitter.com/uQiLy5EZcv
— ANI (@ANI) February 27, 2018
Anil Kapoor arrives at #Mumbai airport, chartered plane carrying mortal remains of #Sridevi to land shortly pic.twitter.com/raIx20n20h
— ANI (@ANI) February 27, 2018
दरम्यान काल रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी खासगी विमानानं श्रीदेवीचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलं. तिथून श्रीदेवीचं पार्थिव अंधेरीतल्या निवासस्थानी नेण्यात आलं. रात्रभर तिच्या अंत्यदर्शनासाठी अंधेरीतल्याच कपूरांच्या भाग्य बंगल्यात बॉलिवूड तारे तारकांची रीघ लागली होती.