मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या ५४व्या वर्षी दुबईत शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. कौटुंबिक सोहळ्यासाठी दुबईत गेलेल्या असताना तेथे त्यांचे निधन झाले.
हार्ट अॅटॅक आल्याने त्यांचे निधन झाले. मात्र अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा आभास काही तासांपूर्वीच झाला होता. त्यांनी ट्विटरवर अशी भीतीही व्यक्त केली होती.
अमिताभ यांनी श्रीदेवीच्या निधनाआधी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है.' असं म्हटलं होतं.
श्रीदेवी आणि अमिताभ यांनी खुदा गवाह या सिनेमात एकत्र काम केले होते. ८ मे १९९२मध्ये आलेल्या या सिनेमात श्रीदेवीने बेनजीरची भूमिका साकारली होती. तर अमिताभने बादशाह खानची भूमिका साकारली होती.
T 2625 - न जाने क्यूँ , एक अजीब सी घबराहट हो रही है !!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 24, 2018
श्रीदेवीचा जन्म १३ ऑगस्ट १९६३मध्ये तामिळनाडूमध्ये झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने कारकिर्दीला सुरुवात केली होती. तामिळ सिनेमा कंधन करुणाई या सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली. दाक्षिणात्या सिनेमातून काम करण्यास सुरुवात केल्यानंतर १९७९मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून सोलवाँ साल या सिनेमातून काम केले.
८०च्या दशकात श्रीदेवी आपल्या कारकीर्दीत एका वेगळ्याच उंचीवर होती. तिने हिम्मतवाला, तोहफा, मिस्टर इंडिया, नगिना सारख्या सुपहिट सिनेमे दिले. तिला लेडी अमिताभ बच्चन म्हटले जात अशे. २०१२मध्ये श्रीदेवीने इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून दमदार पुनरागमन केले होते.