कोणी म्हणूच कसं शकतं की ऋषी कपूर यांना कॅन्सर आहे, 'या' अभिनेत्याचा सवाल

कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळीही ते त्या ठिकाणी हजर नव्हते. 

Updated: Oct 4, 2018, 01:26 PM IST
कोणी म्हणूच कसं शकतं की ऋषी कपूर यांना कॅन्सर आहे, 'या' अभिनेत्याचा सवाल  title=

मुंबई : अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या आईच्या म्हणजेच कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळीही त्या ठिकाणी हजर नव्हते. ज्यानंतर ते त्या ठिकाणी का आले नाहीत, असा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करुन गेला. ऋषी कपूर हे उपचारासाठी परदेशात गेल्यामुळेच या महत्त्वाच्या प्रसंगी पोहोचू शकले नाहीत. सध्याच्या घडीला त्यांच्यासोबत पत्नी नीतू कपूर आणि मुलगा रणबीर कपूरही असल्याचं कळत आहे. 

ऋषी कपूर कोणत्यातरी गंभीर आजाराशी झुंज देत असल्याच्या चर्चांनीही जोर धरला. 

'बॉलिवूड बबल' या संकेतस्थळाचट्या वृत्तानुसार त्यांना डॉक्टरांनी तब्बल ४५ दिवसांच्या उपचारासाठी बोलवल्याचंही म्हटलं गेलं असून या उपचारांमध्ये केमोथेरेपीचाही समावेश असल्याचं कळत आहे. 

या सर्व चर्चांनंतर ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचं म्हणत भलत्याच अफवांनी डोकं वर काढलं. ज्यावर ऋषी यांचे बंधू अभिनेते रणधीर कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

'इ टाईम्स'शी संवाद साधत ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या फक्त अफवा असून, कृपा करुन त्यांना उपचार घेउद्या, असं म्हणत अफवांना पूर्ण विराम दिला. 

खुद्द ऋषी कपूर यांनाच आजाराविषयी काही कल्पना नाही, सध्या तर त्यांच्या उपचाराच्या चाचण्याही पूर्ण झालेल्या नाहीत, तोपर्यंत त्यांना कॅन्सर झाला आहे, असं कोणी कसं म्हणू शकतं. येत्या काळात त्याच्या आजारपणाविषयी कळकताच आम्ही त्याविषयीची माहिती सर्वांना देऊ, असं रणधीर कपूर यांनी स्पष्ट केलं.