थुकरटवाडीमध्ये रंगणार गाण्यांच्या भेंड्या

पाहा हा खास एपिसोड 

थुकरटवाडीमध्ये रंगणार गाण्यांच्या भेंड्या title=

मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला.

आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.

या आठवड्यात चला हवा येऊ द्या च्या मंचावर सज्ज झाले आदेश भावोजी, सुचित्रा बांदेकर. आदेश भावोजी यावेळी 'झिंग झिंग झिंगाट' या नव्या कार्यक्रमानिमित्त थुकरटवाडीत आले. त्यामुळे थुकरट वाडीतसुद्धा गाण्यांच्या भेंड्या रंगल्या. चला हवा येऊ द्या मध्ये 'झिंग झिंग तर्राट' हा कार्यक्रम रंगला ज्यामध्ये तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला आणि बाजी कार्यक्रमांचे कलाकार सहभागी झाले.

यात भाऊ कदम आणि अंकुर वाढवे विक्रांत आणि ईशा, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे नंदिता वाहिनी आणि पाठक बाई तर सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे शेरा व बाजी साकारणार आहेत. निलेशने भावोजींची मिमिक्री केली. या गाण्यांच्या भेंड्या सगळ्यांना पोट धरून हसायला लावणार यात शंकाच नाही. त्यामुळे पाहायला विसरू नका चला हवा येऊ द्या सोमवार मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!