मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता, सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) यांनी त्यांचा मुलगा अभिनेता Naga Chaitanya)नागा चैतन्य आणि त्याची Ex wife समांथा रूथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) यांच्या नात्यावर नुकतंच एक वक्तव्य केलं. नागार्जुन यांच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष पुन्हा या नात्याकडे वेधलं गेलं.
समंथाला या नात्यातून घटस्फोट घ्यायचा होता, नागा चैतन्यनं तिच्या निर्णयाला सहमती दर्शवली. यावेळी त्याला माझी आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेची चिंताही होती, असंही ते म्हणाले होते.
मुलगा आणि सुनेच्या नात्याबाबतच्या याच वक्तव्यावर आता म्हणे नागार्जुन यांनी एक स्पष्टकरण देत काही चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आल्याचं म्हणत कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका असं त्यांनी चाहत्या वर्गाला आवाहन केलं आहे.
'मी समंथा आणि नागा चैतन्यबद्दल जे म्हणालो, जे पूर्ण चुकीच्या पद्धतीने संगण्यात आलं आहे यावर विश्वास ठेऊ नका', असाच सूर त्यांनी आळवला.
दरम्यान, आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीच्या कार्यक्रमादरम्यान खुद्द नागा चैतन्यनं या नात्यात आलेल्या दुराव्यावर मौन सोडलं होतं.
समंथा आणि मी हा निर्णय परस्पर सामंजस्यानं घेतला आहे, दोघांच्या भविष्यातील आनंदासाठी हा निर्णय घेतला गेला असून, समंथा आनंदात आहे तर मीसुद्धा आनंदी आहे, असं तो म्हणाल्याचं पाहायला मिळालं होतं.
एकिकडे नागा चैतन्य असं म्हणत असताना, घटस्फोटाचा निर्णय़ हा समंथाचाच असल्याचं नागार्जुन नेमकं का म्हणाले हाच प्रश्न त्यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित केला गेला होता.
काय म्हणाले होते नागार्जुन?
'नागा चैतन्यनं समंथाच्या निर्णयाला मान दिला. पण, त्याला माझी काळजी वाटत होती. मी काय विचार करेन, समाजातील कुटुंबाच्या प्रतिष्ठेचं काय, असा विचार त्याच्या मनात होता.