विकृतीचा कळस! लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलीला बलात्काराची धमकी

धक्कादायक माहिती समोर 

Updated: Oct 21, 2020, 09:59 AM IST
विकृतीचा कळस! लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलीला बलात्काराची धमकी  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : सहसा कलाकार आणि चाहते यांचं एक अनोखं नातं असतं. कित्येकदा हे नातं शब्दांतही मांडणं कठीण. पण, काही प्रसंगी अशा घटना घडतात की या नात्याला कुठेतरी गालबोट लागतं आणि चित्र अगदी बदलून जातं. सध्या कलाविश्वात अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण, एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाच्या वादामुळं त्याच्या मुलीला बलात्काराच्या धमक्या दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत. विकृतीचा हा कळसच म्हणावा. 

हा लोकप्रिय अभिनेता आहे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती Vijay Sethupathi. श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील माजीर फिरकी गोलंदाज मुथैया मुरलीधरन Muttiah Muralitharan याच्या जीवनावर आधारित बायोपिकमुळं विजय सेतुपतीच्या मुलीला या विकृत धमक्यांना सामोरं जावं लागत आहे. 

vijay sethupati

चेन्नई पोलिसांनी याबाबतची तक्रारही दाखल करुन घेतली आहे. सोमवारीच विजय सेतुपती यानं '800' या चित्रपटातून काढता पाय घेतला. असं असलं तरीही त्याला तामिळनाडूतून होणारा विरोध मात्र कमी झालेला नाही. 
खुद्द पोलीस आयुक्तांनीच ट्विट करत यासंबंधीची माहिती देत सेलिब्रिटीचं नाव न घेता त्याच्याविरोधात येणाऱ्या प्रतिक्रियांबाबत चिंता व्यक्त केली. ज्यानंतर या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठीसुद्धा पावलं उचलण्यात आली. 

 

तामिळ संघटनांचा तीव्र विरोध 

विजय सेतुपती या चित्रपटामध्ये मुरलीधरनचीच भूमिका साकारत मध्यवर्ती भूमिकेत झळकणार होता. पण, तामिळ संघटना, राजकीय पक्ष आणि कलाविश्वातूनही विरोध करण्यात आल्यामुळं त्याने चित्रपटातून काढता पाय घेतला. ट्विटरच्या माध्यमातून त्यानं यासंदर्भातील घोषणा केली होती. चित्रपटाबाबत असणारा वाद आणि विजय सेतुपतीच्या मुलीला येणाऱ्या या धमक्या पाहता, काहींनी अनेक मर्यादा ओलांडल्या असून, ही बाब चिंताजनक असल्याचं स्पष्ट होत