करोडोंच्या गाडीसाठी लाखोंच्या किंमतीचा नंबर; पाहा असं करणारा नादखुळा अभिनेता आहे तरी कोण

या महागड्या कारच्या नंबरसाठीही म्हणे त्यानं तितकाच खर्च केला आहे. 

Updated: Oct 8, 2021, 08:21 AM IST
करोडोंच्या गाडीसाठी लाखोंच्या किंमतीचा नंबर; पाहा असं करणारा नादखुळा अभिनेता आहे तरी कोण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही सेलिब्रिटी हे त्यांच्या कारकिर्दीसोबतच त्यांच्या अनोख्या अंदाजासाठी, आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. अशा सेलिब्रिटींची यादी तशी बरीच मोठी आहे. याच यादीतील एक नाव आता सर्वांचं लक्ष वेधत आहे. या अभिनेत्यानं नुकतीच एक महागडी कार खरेदी केली आणि या महागड्या कारच्या नंबरसाठीही म्हणे त्यानं तितकाच खर्च केला आहे.

हा अभिनेता आहे दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर. ज्युनियर एनटीआर हा त्याच्या दिमाखदार जीवनशैलीसाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच त्यानं महागडी अशी लॅम्बॉर्गिनी उरुस ग्रॅफाईट कॅप्सूल खरेदी केली. संपूर्ण भारतात तो या गाडीचा पहिलाच मालक ठरला आहे. या कोट्यवधींच्या कारसाठी त्यानं खास नंबरही निवडला आहे. ज्या नंबरसाठी त्यानं लाखो रुपये खर्च केले आहेत.

तेलंगना वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्युनियर एनटीआरनं त्याच्या नव्या कारच्या नंबरसाठी तब्बल 17 लाख रुपये मोजले आहेत. त्याच्या या नव्या कारचा नंबर आहे ‘TS09 FS 9999’. ऑगस्ट महिन्यातच त्याला या कारची डिलीव्हरी मिळाली होती.

India's first Lamborghini Urus Graphite Capsule makes its way to Actor Jr  NTR garage! What you need to know about THIS SUPER SUV? Check DETAILS here  | Zee Business

ज्युनियर एनटीआरच्या या कारची किंमत 3.16 कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातं. काळ्या रंगाची ही कार 0 ते 100 किमी चा वेग अवघ्या 3.6 सेकंदांमध्ये पकडते. या कारचा टॉप स्पीड 305 किमी प्रतितास इतका आहे. जगातली सर्वात वेगवान एसयूव्ही अशी या कारची खास ओळख आहे.