South Cinema : Vijay Sethupathi च्या फिल्म सेटवर दुर्घटना, Stuntman चे निधन

South Cinema : चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान Stuntman चा मृत्यू, नेमकं काय आहे प्रकरण

Updated: Dec 5, 2022, 02:27 PM IST
South Cinema : Vijay Sethupathi च्या फिल्म सेटवर दुर्घटना, Stuntman चे निधन title=
South Cinema Accident on Vijay Sethupathi film sets Stunt Man S Suresh dies Bollywood News nz

Stunt Man S Suresh : आपल्या सगळ्यांनाच ॲक्शन चित्रपट (Action Movies) पाहायला आवडतात. ॲक्शन चित्रपट हे हॉलिवूड (Hollywood) आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीत (South Fil Industry) जास्त पाहायला मिळतात. पण अनेकदा शूटिंगदरम्यान काही वाईट घटना घडतात. अशीच एक घटना समोर आली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 54 वर्षीय स्टंट मॅनचा (Stunt Man) मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार (Media Report), स्टंट मॅन एस सुरेश (Stunt Man S Suresh) विजय सेतुपतीच्या एका चित्रपटासाठी (Vijay Sethupathi film) परफॉर्म करत होता. यादरम्यान अचानक त्यांचा मोठा अपघात झाला. या घटनेनंतर सेटवर (Set) उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला धक्का बसला आहे. (South Cinema Accident on Vijay Sethupathi film sets Stunt Man S Suresh dies Bollywood News nz)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक वेत्रीमारन यांच्या दिग्दर्शनाखाली विदुथलाई या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यादरम्यान सुरेश मुख्य स्टंट दिग्दर्शकासोबत असिस्टंट म्हणून काम करत होता. चित्रपटातील एका दृश्यानुसार त्याला जंपिंग स्टंट करायचा होता. त्यासाठी सुरेशला दोरीच्या साहाय्याने क्रेनला बांधण्यात आले. मात्र, दृश्य सुरू होताच दोर तुटला आणि स्टंटमॅन सुरेश सुमारे 20 फूट उंचीवरून थेट खाली पडला.

अपघातानंतर सेटवर सगळं थक्क झालं. घाईघाईत सुरेशला खाजगी रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुरेशला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही बातमी समोर आल्यानंतर चित्रपटाच्या सेटवर क्षणात शोककळा पसरली.

 

25 वर्षांपासून इंडस्ट्रीत स्टंट मॅन म्हणून काम

गेल्या 25 वर्षांपासून सुरेश इंडस्ट्रीत स्टंट मॅन म्हणून काम करत होते. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. सध्या या घटनेमुळे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे.