लेस्बियन अभिनेत्री आणि त्यांचे इंटिमेट सीन, व्हिडिओ सर्वाधिक पाहिला गेला...

दोघांवर शूट केलेले बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आता व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 24, 2022, 01:55 PM IST
 लेस्बियन अभिनेत्री आणि त्यांचे इंटिमेट सीन, व्हिडिओ सर्वाधिक पाहिला गेला... title=

मुंबई : चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा 8 एप्रिलला एक अतिशय बोल्ड चित्रपट घेऊन येत आहेत. लेस्बियन प्रेमकथेवर बनलेल्या या चित्रपटाचे नाव 'खतरा डेंजरस' आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खत्रा डेंजरस हा देशातील पहिला लेस्बियन क्राईम अॅक्शन ड्रामा आहे. त्याचा ट्रेलर इतका बोल्ड आहे की तो पाहिल्यानंतर सगळेच भारावून गेले आहेत.

या चित्रपटात साऊथ स्टार अप्सरा राणी आणि नैना गांगुली यांच्या जबरदस्त भूमिकांनी सगळ्यांच लक्षवेधलं आहे. दोघांवर शूट केलेले बोल्ड आणि इंटिमेट सीन्स आता व्हायरल होत आहेत.

बेडरुमच्या रोमान्सपासून ते किसिंग सीनपर्यंत अप्सरा आणि नैनाने खूप बोल्डनेस दाखवला आहे.

 

अप्सरा राणीचे खरे नाव Anketa Maharana आहे. ती तेलगू चित्रपटांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म देहरादूनमध्ये झाला. ओडियाच्या हिंदू कुटुंबात ती वाढली. अप्सराला लहानपणापासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती.

तर या सिनेमातील दुसरी अभिनेत्री नैना हिंदी आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करते. नैनाला 'मेरी बेटी सनी लिओनी बना चाहती है' या चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटात नैनाच्या कामाची दखल घेतली गेली.