आता अशी दिसते 'लाल दुपट्टा' गाण्यातील अभिनेत्री, फरक पाहून बसेल धक्का

 बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आल्या आणि काही सिनेमात काम करुन गायब झाल्या. 

Updated: Mar 24, 2022, 01:29 PM IST
आता अशी दिसते 'लाल दुपट्टा' गाण्यातील अभिनेत्री, फरक पाहून बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आल्या आणि काही सिनेमात काम करुन गायब झाल्या. या अभिनेत्रींमध्येच एक नाव म्हणजे रितू शिवपुरी आहे. जी २९ वर्षांआधी आलेला सिनेमा 'आखे'मधून घरांघरात पोहोचली. या सिनेमात तिच्यावर लाल दुपट्टा गाणं चित्रीत करण्यात आलं. जे बरंट हिटही झालं. 

या सिनेमानंतर रितूने काही सिनेमात काम केलं. मात्र हे सिनेमा फ्लॉप झाले. आणि अचानक रितू सिनेसृष्टीतून गायब झाली.  काही वर्षांआधी एका मुलाखतीत रितू बॉलिवूडमधून एक्झिट होण्यामागचं कारण सांगितलं. 

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रितूने बॉलिवूडपासून दूर राहण्यामागचं कारण सांगितलं होतं. फिल्म इंडस्ट्रीच्या कामाच्या पद्धतीमुळे अडचण असल्याचं तिने म्हटलं होतं. तिला कास्टिंग काउच सारख्या गोष्टींना कधीच सामोरं जावं लागलं नाही. मात्र इंडस्ट्रीमध्ये असे बरेच लोकं तिला भेटले जे तिला काम देण्याच्या बहाण्याने तिला भेटण्याची किंवा कॉफीवर येण्याची ऑफर देत होते.

ही गोष्ट तिला अजिबात आवडली नाही. त्यामुळे तने सिनेसृष्टीच सोडणं योग्य मानलं. चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर रितूने लग्न केलं आणि तिच्या कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. त्यानंतरही ती अनेक वर्षांनंतर काही टेलिव्हिजन मालिकांमध्येही दिसली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या म्हणण्यानुसार, ती शूटिंगवरून जेव्हा रात्री उशिरा घरी परतायची. तेव्हा तिचे कुटुंबीय झोपायला जायचे. अशा परिस्थितीत कुटुंबाला वेळ न दिल्याचा पश्चातापही तिला होत होता. त्यामुळे तिने टीव्ही शोमध्येही काम करणं सोडलं. यानंतर रितूने ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करिअर केलं. आणि ती बऱ्यापैकी यशस्वी झाली. रितूच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर ती आधीपेक्षा जास्त सुंदर आणि ग्लॅमरस आहे. ती 47 वर्षांची आहे.