Sonu Sood बनला देवदूत ! अपघातग्रस्त तरुणाला उचलून सोनू सूद धावला; वाचला तरुणाचा जीव | पाहा व्हिडीओ

भीषण अपघात पाहून सोनू सूदने थांबवली गाडी, बेशुद्ध तरूणाला बाहेर काढत गाठलं हॉस्पिटल 

Updated: Feb 10, 2022, 08:10 AM IST
Sonu Sood बनला देवदूत ! अपघातग्रस्त तरुणाला उचलून सोनू सूद धावला; वाचला तरुणाचा जीव | पाहा व्हिडीओ title=

मुंबई : कुणाचाही जीव वाचवणं याहून पुण्य ते काय? जीव वाचवणारा 'देवदूत' म्हणून ओळखला जातो. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)  पुन्हा एकदा मसीहा ठरला आहे. सोनू सूदने अनेकांचे फक्त जीव वाचवले नाही तर त्यांना नवं जीवनदान दिलं आहे. (Sonu Sood saved 19 years old road accident victim take him to hospital watch video ) 

अनोळख्या व्यक्तीच्या मदतीसाठी कायमच बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कायम पुढे असतो. पुन्हा एकदा सोनू सूदने माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. भीषण अपघातात जखमी अशा बेशुद्धावस्थेत पडलेल्या १९ वर्षीय तरूणाचे सोनू सूदने प्राण वाचवले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोनू सूदने वाचवले तरूणाचे प्राण 

हा अपघात पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोटकपूर बायपास जवळील आहे. येथे १९ वर्षीय तरूणाचा अपघात झाला. या अपघातात तरूण जबर जखमी झाला होता. 

तेथून जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने अपघात पाहिला. आणि तो तेथेच थांबला. अपघातग्रस्त तरूणाला वाचवण्यासाठी सोनू सूदचा आटापाटा सुरू झाला. 

दोन गाड्यांच्या अपघातात एक तरूण जबर जखमी झाला. ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा लॉक झाला होता. बेशुद्धावस्थेतील तरूणाला बाहेर पडणं कठीण होतं. 

अशावेळी सोनू सूदने धावत जाऊन तरूणाला तात्काळ गाडीतून बाहेर काढलं. त्यानंतर त्याने त्याला रूग्णालयात दाखल केलं. 

अपघात पाहताच थांबवली गाडी 

यावेळी सोनू सूद तिथून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाल्याचे पाहताच त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून गाडीची काच फोडली आणि तो तरुण बाहेर आला. विशेष म्हणजे सोनूची बहीण मालविका सूद मोगामधून विधानसभा निवडणूक लढवत आहे. त्यामुळे सोनू बहिणीच्या प्रचारासाठी पंजाबमध्ये पोहोचला आहे.