सोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Updated: Oct 3, 2023, 07:33 PM IST
सोनू निगम 'वडापाव ' खातोय की गातोय; व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा title=

मुंबई :  बॉलीवूडचा प्रथितयश गायक सोनू निगम  एक अनोखे खुमासदार गीत घेऊन येत आहे, प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातील हे गीत आहे. एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, एक्सआर स्टुडिओ,व्हिक्टर मुव्हिज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट मिळून लवकरच प्रेक्षकांसाठी गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असलेला 'वडापाव' हा चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. प्रसाद ओक दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाचं नाव 'वडापाव' असल्यामुळे प्रदर्शनाआधीच तो चर्चेत आला आहे. 

प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात सविता प्रभुणे, गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर आणि दस्तुरखुद्द प्रसाद ओक अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. प्रसाद ओकच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या आतापर्यंतच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना कुटुंब आणि त्यातील  नात्यांचा गोडवा नेहमीच अनुभवण्यास दिला. त्यामुळे अर्थातच प्रसाद ओकच्या आगामी 'वडापाव' चित्रपटाविषयी  सर्वांनाच उत्सुकता आहे. 

kahanibazz या इन्स्टाग्राम अकाऊन्टवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये सोशल मीडियाच्या कॅप्शनमध्ये लिहीलं गेलं आहे की, ''and its a wrap.
काही महिन्यांनी वडा पाव रसिकप्रेक्षकांचा होईल. पण हा @oakprasad माणूस already माझा झालाय.खरतरं “सर” म्हणावं असं व्यक्तिमत्त्व पण मी दादा म्हणतो. कारण ह्या शब्दात जिव्हाळा आहे,प्रेम आणि आपलेपणा आहे. कुटुंब असल्याची जाणीव आहे. दादा हा फोटो मुहूर्ताचा आहे पण wrap up साठी जपून ठेवला होता. कारण आपल्यात कधीच wrap up होणार नाहिये म्हणून. मला काय दिलं ह्या चित्रपटाने ? समाधान !!आपण पुढे एकत्र काम करू हा योग येईल की नाही ते माहित नाही. पण आजवर लेखक म्हणून समाधान, मला फक्त हा चित्रपट करताना मिळालं हे मी जाहीरपणे सांगतो. दादा तू कमाल आहेस. लव यू. कायम सोबत रहा.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचलली आहे. तर चित्रपटाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, सनिस खाकुरेल हे आहेत. या चित्रपटाचे लेखन सिद्धार्थ साळवी यांनी केलं आहे. तसंच, चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी संजय मेमाणे यांच्याकडे आहे. संगीतकार कुणाल करण 'वडापाव' या आगामी चित्रपटाचे संगीतकार आहेत तर मंदार चोळकर हे गीतकार आहेत. तेव्हा तयार रहा घमघमीत वडापावची झणझणीत चव अनुभवायला.