मुंबई : सेलिब्रिटीच लग्न म्हटलं की चर्चा तर होणारच. मग ही चर्चा होते त्यांच्या डेस्टिनेश वेडिंगची, लेहग्यांची आणि बऱ्याच गोष्टींची. 8 मे रोजी लग्नबंधनात अडकलेल्या सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. आता चर्चा होतेय सोनम कपूरच्या मंगळसूत्राचं. लग्नात स्त्रीचं सौभाग्यचा दागिना म्हणून मंगळसूत्राकडे पाहिलं जातं. विवाहित स्त्रीचा हा अत्यंत महत्वाचा दागिना आहे. या दागिन्याची सध्या चर्चा होतेय. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे.
8 मे 2018 रोजी सोनम आणि आनंद याचं लग्न झालं. या दोघांनी अगदी शिख पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाडला. आनंद कराज पद्धतीने हा सोहळा झाला. या लग्नाला अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या सगळ्याची चर्चा झाली. आणि आता चर्चा होतेय ती म्हणजे सोनम कपूरच्या मंगळसूत्राची. जे अगदी रॉयल असल्याची चर्चा होतेय.आनंद आहुजा गळ्यात मंगळसूत्र घालताना सोनम कपूर अगदी जवळ आली होती. तसंच या मंगळसूत्राने या दोघांना आयुष्यातही अगदी जवळ आणलं आहे.
सोनम कपूरचं मंगळसूत्र हे इतर मंगळसूत्रांपेक्षा वेगळं आहे. महत्वाची बाब म्हणजे सोनमने आपलं मंगळसूत्र स्वतः डिझाइन केलं आहे. आणि हे मंगळसूत्र अगदी विचार करून डिझाइन केलं आहे. आणि त्यानंतर हे मंगळसूत्र उशिता देवानी रवतानी यांनी तयार केलं आहे. या मंगळसूत्रात असलेली दोन्ही चिन्ह ही आनंद आणि सोनमच्या राशीची चिन्ह आहेत. नववधु सोनम ही मिथुन राशीची आहे त्याचं चिन्ह डाव्याबाजूला आहे तर आनंद आहुजाची सिंह रास आहे त्याच चिन्ह उजव्या बाजूला आहे. आणि या दोघांना जोडणारा एक डायमंड मध्यभागी आहे.