मुंबई : अनिल कपूर यांच्या घरी सध्या लगीन घाई सुरू आहे. येत्या 8 मे रोजी सोनम कपूर आणि आनंद अहुजा विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी कपूर कुटुंबीय आणि बॉलिवूडक्षेत्रातील सोनम कपूरचा मित्रपरिवार तिच्या मेहंदी आणि संगीत सेरेमनीसाठी सज्ज झाला आहे.
सोनम कपूरच्या लग्नाचे सारे ड्रेस अनामिका खन्ना डिझाईन करणार आहे अशी माहिती मिळाली आहे. तर सोनम मेहंदी सेरेमनीमध्ये कोणता ड्रेस घालणार आहे याचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडलाईफने शेअर केलेल्या एका बातमीनुसार, सोनम लहेंगा -चुनरी आज सोनमच्या घरी पोहचली आहे. सफेद रंगाच्या साध्या आणि सिंपल ड्रेसवर नाजूक प्रिंट आहे.
सोनमने तिच्या लग्नाबबातचे यापूर्वी मुलाखतीमध्ये अनेकदा सांगितले आहे. त्यानुसार सोनमला साधे ड्रेसच लग्नातही घालायला आवडतील असे सांगितले होते. सोनमला भारतीय पारंपारिक वेषभूषेबद्दल खास आकर्षण आहे. फवाद खानला 'खुबसुरत' मध्ये सजवणारा 'हा' डिझाईन करणार सोनमच्या पतीचा लूक
आनंद अहुजा आणि सोनम कपूर गेले अनेक महिने रिलेशनशिपमध्ये होते. येत्या 8 मे रोजी हे दोघही विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. मुंबईत गुरूद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडल्यानंतर संध्याकाळी ग्रॅन्ड रिसेप्शन होणार आहे. सोनम कपूरच्या लग्न तयारीच्या उत्साहात संजय कपूरचा रस्त्यावर भांगडा