अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ...

मराठी भावसंगीतामध्ये 'किंग ऑफ रोमान्स' समजले जाणार्‍या अरूण दातेंचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

Updated: May 6, 2018, 02:56 PM IST
अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ... title=

 मुंबई : मराठी भावसंगीतामध्ये 'किंग ऑफ रोमान्स' समजले जाणार्‍या अरूण दातेंचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आज सकाळी राहत्या घरी अरूण दातेंचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. 
 
 अरूण दातेंची गायन क्षेत्रामध्ये सुरूवात आकाशवाणीवरून झाले. त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली आहे. अरूण दातेंच्या निधनानंतर संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.  

 लता मंगेशकरांचे खास ट्विट  

 ट्विटरच्या माध्यमातून भारताची गानकोकिळा समजल्या जाणार्‍या लता मंगेशकरांनी अरूण दातेंना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान त्यांनी ट्विटर खास आठवणही शेअर केली आहे. 
 

 आज लोकप्रिय गायक अरुण दाते यांच्या निधनाची बातमी समजताच मला अतीव दु:ख झाले. माझी त्यांची ओळख नंतर झाली परंतु त्यांच्या वडीलांची माझी ओळख कुमार गंधर्वजींच्या घरी आधी झाली होती.त्यांचे व आमच्या संपूर्ण परिवाराचे अत्यंत चांगले सम्बंध होते.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो.   

 
अरूण दातेंची अजरामर गाणी - 

भातुकलीच्या खेळामधली... , स्वरगंगेच्या काठावर...,  दिवस तुझे हे फुलायचे’, ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी’…’येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे .. यासारखी अजरामर गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.