Sonam Kapoor नं BKC मधील आलिशान फ्लॅट विकला, मोजून घेतली तगडी रक्कम

Sonam Kapoor नं नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत तिचा पती आनंद अहूजा आणि मुलगा वायू कपूर अहुजाचा फोटो शेअर केला होता. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर, इतक्यात सोनमनं मुंबईतील तिची एक प्रॉपर्टी विकली आहे. 

Updated: Jan 4, 2023, 12:28 PM IST
Sonam Kapoor नं BKC मधील आलिशान फ्लॅट विकला, मोजून घेतली तगडी रक्कम title=

Sonam Kapoor Sales Her Old Property : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. अनिल कपूर (Anil Kapoor's Daughter)  यांची लाडकी लेक सोनमचे लाखो चाहते आहेत. सध्या सोनम ही तिच्या मुलासोबतचा वेळ एन्जॉय करत आहे. सोनम तिचा पती आनंद आहुजा (Anand Ahuja) आणि मुलगा वायुसोबत (Vayu Kapoor Ahuja) सध्या सुट्टीचा आनंद घेत असून ती उत्तराखंडमध्ये आहे. तेथे सुट्टीचा आनंद घेत असताना सोनमविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनमचा मुंबईतील बीकेसी येथे 2015 साली घेतलेला फ्लॅट आता कोट्यावधींच्या किंमतीत विकला आहे. 

Squarefeatindia नं दिलेल्या वृत्तानुसार, सोनम कपूरनं हा फ्लॅट 31.48 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सोनमनं हा फ्लॅट 32.50 कोटींना विकला होता. सोनमला हा फ्लॅट विकण्यात जास्त फायदा झालेला नाही. ज्या व्यक्तीनं सोनमचं हे घर विकत घेतले आहे, त्या व्यक्तीला 4 पार्किंग देखील मिळाल्या आहेत. ज्या सोसायटीत सोनमचं हे घर होते, तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. इतकंच काय तर सोनमनं हा फ्लॅट जास्त वापरला नाही असे म्हटले जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, Squarefeatindia चे संस्थापक वरुण सिंग यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सोनमने विकलेले हे घर सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट (BKC) मध्ये होती. सोनमचं हे घर शांत परिसरात होते. सोनमचा हा फ्लॅट सिग्नेचर बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर होता. SMF इन्फ्रास्ट्रक्चरने हे घर सोनमकडून विकत घेतले आहे. ज्या व्यक्तीनं हे घर विकत घेतलं आहे, त्यानं 1.95 कोटी रुपयांची स्टंप ड्यूटी भरल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : Mahesh Babu चा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढला बोहाल्यावर! सोशल मीडियावर उडाली खळबळ

सोनमनं नुकताच आपल्या छोट्या बाळाचा फोटो शेअर (Sonam Kapoor Latest Photo on Instagram) केला आहे. या फोटोमध्ये वडील आनंद अहूजा तान्ह्या वायूला कडेवर घेऊन मोकळ्या रस्त्यावर चालत आहे.तर वडिलांच्या खांद्यावर वायू शांत झोपलेला दिसतो आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर सुर्याचा प्रकाश आल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा फोटो थोडा लपवल्यासारखा वाटत असला तरी त्यात वायूचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनमनं असं लिहिलं आहे की, ''माझे हे दोघे Leos, हे माझं संपुर्ण जग आहे. आमच्यासाठी मागील वर्ष हे खूप खास होतं. तुम्हाला सगळ्यांना उशिरा विश करतेय पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा. दररोज आपल्या आयुष्य सुंदर होत आहे. देवा, तुझे आभार. आजपर्यंत मला माझ्या आयुष्यानं जे काही दिलं आहे त्यासाठीही मी ऋणी आहे. प्रत्येक दिवस हा खूपच खास आहे.'