लाखो कमाई करणाऱ्या सोनम कपूरवर का आली झाडू-पोछा करण्याची वेळ?

अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे

Updated: Jul 6, 2021, 10:16 PM IST
 लाखो कमाई करणाऱ्या सोनम कपूरवर का आली झाडू-पोछा करण्याची वेळ?   title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. तिचा नवरा आनंद आहूजासोबत ती राहते. सोनम जरी लंडनमध्ये शिफ्ट झाली असली तरी ती कायम भारतात येत असते. सोनमचं सासर दिल्लीत असून तिथे आनंदचे आईवडील राहतात. सेलिब्रिटी असल्याने सोनमचं आयुष्य मुंबईत पूर्णपणे वेगळं होतं. तर, लंडनमध्ये ती तिच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे.

सोनम घरातली सगळी कामं करते
सोनम कपूरने एका मुलाखतीत सांगितलं की, ती घरातील सगळी कामं स्वत: करते. स्वयंपाक असो की साफसफाई, सगळीच काम सोनम स्वत: करते. दिलेल्या एका मुलाखतीत सोनम म्हणाली की, 'मला इथे माझं स्वातंत्र्य आवडतं. मी माझा स्वत:चा स्वयंपाक, साफसफाई ते किराणा सामान विकत घेण्यापर्यंत मी सगळी काम करते.

नवीन ठिकाणी राहणं कठीण
सोनम पुढे म्हणाली की, 'लंडनमध्ये मला जाणवलं की, मी एक भारतीय आहे. एका नवीन ठिकाणी राहणं कठीण आहे. मला मुंबईची आठवण येते. मला माझं कुटुंब, माझे मित्र, ट्राफिक, तिथलं फूड, फिल्म इंडस्ट्री सगळ्याचीच मला फार आठवण येते. याआधी, सोनमने लंडनमधील आनंद आहूजाबरोबरची एक फोटो शेअर केला होता आणि ती म्हणाले की, 'मला भारताची खूप आठवण येते. मला घरी परत जायचं आहे. मी माझं कुटुंब आणि मित्र परिवाला भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

तीन वर्षांपूर्वी झालं लग्न 
सोनम कपूर आणि आनंद आहूजाचं लग्न 8 मे 2018 रोजी लग्न झालं. सोनम नेहमी आनंद आहूजाबरोबर फोटो शेअर करते. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर याआधी ती अनुराग कश्यप आणि अनिल कपूरचा चित्रपट AK Vs AKमध्ये कॅमिओ करताना दिसली होती