सोनम कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री सोनम कपूरने आज म्हणजेच 20 ऑगस्ट 2022 रोजी मुलाला जन्म दिला आहे. 

Updated: Aug 20, 2022, 04:32 PM IST
सोनम कपूरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन title=

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने नुकताच मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्या वतीने ही पोस्ट आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला.

नीतू कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचं स्वागत केलं आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे. मात्र आपल्याला माहित आहे का? की, आता आपलं जीवन कायमचं पूर्णपणे बदलणार आहे. सोनम आणि आनंद.
 
सोनम कपूरने 2018 साली मुंबईत उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्न केलं. काही महिन्यांपूर्वी सोनम आणि आनंदने प्रेग्नंसीची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. दोघांनी त्यांचे काही सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'चार हात. तुझ्या सर्वोत्तम काळजी आम्ही तुझ्यासाठी करू शकतो. दोन हृदये. जे तुझ्यासोबत धडधडेल, आमचं कुटुंब, जे तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल आणि साथ देईल. आम्ही आता तुझं स्वागत करण्यास धीर धरू शकत नाही.'