लग्नानंतर अवघ्या काही तासात सोनम कपूरने बदललं तिचं नाव !

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहुजा आज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. सोनम कपूरचं लग्न कपूर कुटुंबातील कविता सिंह यांच्या हॅरिटेज बंगल्यामध्ये झाले.शीख रीतिरिवाजानुसार सोनम आणि आनंद विवाहबंधनात अडकले. कपूर कुटुंबीयांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी पोहचले होते. 

Updated: May 8, 2018, 07:01 PM IST
लग्नानंतर अवघ्या काही तासात सोनम कपूरने बदललं तिचं नाव !  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद अहुजा आज अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. सोनम कपूरचं लग्न कपूर कुटुंबातील कविता सिंह यांच्या हॅरिटेज बंगल्यामध्ये झाले.शीख रीतिरिवाजानुसार सोनम आणि आनंद विवाहबंधनात अडकले. कपूर कुटुंबीयांप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी पोहचले होते. 

सोशल मीडीयात केला बदल 

लग्नानंतर अवघ्या काही तासामध्येच सोशल मीडियामध्ये सोनम कपूरने तिचे नाव बदलले आहे. सोनमच्या इंस्टाग्राम  अकाऊंटवर तिचे नाव सोनम कपूर अहुजा असे करण्यात आले आहे. 

सोनम 32 वर्षीय आनंद अहुजासोबत विवाहबंधनात अडकली आहे. आनंद अहुजा हा दिल्लीत एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. अनेक वर्ष आनंद आणि सोनम रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या मदतीने त्यांची ओळख  झाली. 

आज ग्रॅन्ड रिसेप्शन 

लाल रंगाच्या पारंपारिक लेहंगा चोलीमध्ये सोनम कपूर अत्यंत देखणी दिसत होती. तर आनंद अहुजाने बेज रंगाची शेरवानी घातली होती. आज सकाळी वांद्रा येथे लग्नविधी पार पडल्यानंतर संध्याकाळी मुंबईत ग्रॅन्ड रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.