'एक लडकी को...'मध्ये बाप-मुलीची जोडी पहिल्यांदाच एकत्र!

सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय

& Updated: Jun 28, 2018, 02:47 PM IST

मुंबई : '१९४२ : ए लव्ह स्टोरी' या सिनेमातलं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं तुमच्या ओठांवर आजही खेळत असेल... याच गाण्याच्या शब्दांच्या नावाचा एक सिनेमा आता मोठ्या पडद्यावर येतोय. या सिनेमात पहिल्यांदाच अनिल कपूर आणि सोनम कपूर ही खरीखुरी बाप-मुलीची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

शेली चोप्रा धर दिग्दर्शित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमात सोनम आणि अनिल कपूर यांच्याशिवाय अभिनेता राजकुमार राव आणि जुही चावलादेखील मुख्य भूमिकेत आहेत. 

सिनेमाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. यात सोनम स्वीटी चौधरी नावाच्या एका टिपिकल पंजाबी मुलीच्या भूमिकेत दिसतेय... ही एक 'स्यापा' लव्ह स्टोरी असल्याचं टीझरमध्ये म्हटलं गेलंय. 

हा सिनेमा बाप-मुलीच्या भावनात्मक नात्यावर आधारित असल्याचं सिनेमाच्या टिझरवरून लक्षात येतंय.