Sonali Phogat Murder mystery : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात (goa) मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. सोनाली फोगट हत्ये प्रकरणी रोज नवीन रहस्य समोर येत आहे. आता सोनालीच्या हत्या प्रकरणात सीबीआय मोठा खुलासा करणार आहे. सीबीआयकडून ग्रँड लियोनी रिसॉर्टची 10 तास झडती घेण्यात आली आहे. सीबीआयकडून रिसॉर्टच्या कर्मचा-यांची चौकशी करण्यात आली आहे.
सोनाली फोगट यांच्या मुलीकडून सीबीआय चौकशीची मागणी (CBI will make a big disclosure)
आता या तपासात काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोनाली फोगट यांचा मृत्यू अपघाती होता की त्यांची हत्या झाली, हे अहवालानंतर कळेल. दरम्यान, सोनाली फोगट यांचं कुटुंब आणि तिची मुलगी सतत सीबीआय चौकशीची मागणी करत होते.
त्यानंतर हरियाणा सरकारने तपासाबाबत गोवा सरकारशी बातचीत केली. अखेर गोवा सरकारच्या पुढाकाराने या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यामुळे सोनाली फोगट हत्येचं रहस्य कधी समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सोनाली फोगाट यांनी भाजपच्या (BJP) तिकीटवर हरियाणामधील आदमपूर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र ही निवडणूक त्या हरल्या होत्या. भाजपने सोनाली यांची हरियाणा युनिटच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली होती.