कॅन्सरच्या अफवांनंतर समोर आला ऋषी कपूर यांचा हा फोटो

हा फोटो बघून तुम्हाला बसेल धक्का 

कॅन्सरच्या अफवांनंतर समोर आला ऋषी कपूर यांचा हा फोटो  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली की, बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांना कॅन्सरशी दोन हात करत आहेत. पण त्यानंतर अगदी लगेचच रणधीर कपूर यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं. ऋषी कपूर यांनी अमेरिकेत जाताना एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, मेडिकल ट्रिटमेंटकरता जात असल्याचं सांगितलं. त्यांनी चाहत्यांना विनंती केली की, कोणतीही काळजी करू नका? असं सगळं असताना ऋषी कपूर यांचा फोटो समोर आला आहे. 

या फोटोत ऋषी कपूर यांच्यासोबत प्रियंका चोप्रा आणि नीतू कपूर देखील दिसत आहे. प्रियंका चोप्राने हा फोटो इस्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रियंकाने हा फोटो शेअर करताना म्हटलं की, तुम्हा दोघांना भेटून खूप चांगल वाटलं. नेहमीप्रमाणे मला खूप आनंद मिळाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Was so good seeing you both @neetu54 #RishiKapoor laughter and smiles as always!! 

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

सोमवारी ऋषी कपूर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ त्यांनी स्वतः आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत अनुपम खेरसोबत फिरताना दिसत आहे. सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर ऋषी कपूर यांनी यावर्षी '102 नॉट आउट' आणि 'मुल्क' सारख्या सिनेमांत दिसले. 'मुल्क' या सिनेमात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांनी देखील हे कॅरेक्टर लोकप्रिय झालं. हा सिनेमा ऑगस्टमध्ये रिलीज झाला.