'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन

Sonakshi Sinha Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची चर्चांना उधाण आलंय. हे दोघे अनेक वर्षांच्या नात्याला 23 जूनला लग्नबंधनात अडकवणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jun 11, 2024, 03:13 PM IST
'मला आई-वडिलांपेक्षा...' झहीर इक्बालशी लग्नबद्दल सोनाक्षीने सोडलं मौन title=
Sonakshi Sinha wedding

Sonakshi Sinha Wedding : हीरामंडी या वेब सीरिजमुळे सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली. तिच्या लग्नाची अफवा मीडियामध्ये वरच्या वर उडत असते. गेल्या वर्षी सोनाक्षी सिन्हा सलमान खानसोबत लग्न करणार आहे, अशी अफवा पसरली होती. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत मुंबईत लिव्हिंग रिलेशनमध्ये राहते. ती लवकरच त्यांच्या या नात्याला लग्नाच्या पवित्र बंधनात अडवकणार आहे, अशी बातमी समोर आली आहे. मुंबईत 23 जूनला ती लग्न करणार आहे. लग्नाचा पत्रिका, लग्न स्थळ अगदी ती हिंदू की मुस्लिम कुठल्या विधीनुसार लग्न करणार या गोष्टींबद्दल मीडियामधून चर्चा रंगली आहे. 

लग्नाबद्दल सोनाक्षीची पहिली प्रतिक्रिया...

खरंच सोनाक्षी लग्न करणार आहे का? याबद्दल सोनाक्षीने मौन सोडलंय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने लग्नाबद्दल भाष्य केलंय. ती या मुलाखतीत म्हणाली की, 'मला लग्नाबद्दल नेहमीच विचारलं जातं आणि आता असं मी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडूनही देते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाबद्दल बोलण्याबद्दल कोणालाही हक्क नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी निवड आहे. त्याबद्दल लोक का इतकं प्रश्न विचारत आहेत हेच मला कळत नाही. खरं तर माझ्या आई - वडिलांपेक्षा इतर लोकच लग्नाबद्दल अधिक विचारतात. हे मला खूप मजेदार वाटतं आणि आता मला त्याची सवय झालीय. याचा मला त्रास होत नाही. मात्र लोक माझ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहेत. मी तरी काय करू शकते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

हेसुद्धा वाचा - 'तिने अजून आम्हाला...' झहीर इक्बाल आणि सोनाक्षीच्या लग्नावरुन शत्रुघ्न सिन्हा नाराज?

इंडिया टुडेने सूत्रानुसार अशी माहिती दिली आहे की, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे 23 जूनला लग्न करणार आहेत. त्यांनी या वृत्ता लिहिलंय की, या लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य असणार आहे. त्यासोबत हीरामंडीतील सर्व कलाकरांना खास निमंत्रण देण्यात आलंय. एवढंच नाही तर या लग्नाची पत्रिकाही तयार झाली आहे, असं सांगितलं जातंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

या पत्रिकेचा मजूकर असा आहे की, 'अफवा खऱ्या आहेत.' सोबतच या लग्नातील सर्व पाहुण्यांना फॉर्मल्समध्ये येण्याबद्दल सांगण्यात आलंय. या दोघांच्या लग्नाचा सोहळा मुंबईतील बास्टियनमध्ये रंगणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. खऱं तर या लग्नाबद्दल सोनाक्षी आणि झहीरकडून अधिकृत काही घोषणा करण्यात आलेली नाही.