या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव

योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत. 

Updated: Aug 3, 2017, 10:57 AM IST
या रिअॅलिटी शोमध्ये दिसणार बाबा रामदेव title=

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव पहिल्यांदा एखाद्या टीव्ही शोमध्ये भाग घेणार आहेत. बाबा रामदेव ओम शांति ओम या रिअॅलिटी शोमध्ये ते दिसणार आहेत. 

रामदेव बाबांसह बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. लाईफ ओकेवर हा शो टेलिकास्ट केला जाणार आहे. 

यासाठी पवईस्थित एका स्टुडिओमध्ये शूटिंगही सुरु करण्यात आलेय. यात बाबा रामदेव महागुरुच्या भूमिकेत दिसतील. या शोमध्ये स्पर्धक भजन गाणार आहेत. 

बाबा रामदेव आणि सोनाक्षी सिन्हासह संगीत दिग्दर्शक, गायक शेखर रावजियानी, कनिका कपूर आणि टेलिव्हिजन विश्वातील गाजलेली अभिनेत्री मौनी रॉसुद्धा परिक्षकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे.