अखेर सत्य समोर; सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये?

 काही दिवसांपासून झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत आहेत. 

Updated: May 6, 2022, 05:37 PM IST
अखेर सत्य समोर; सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये? title=

मुंबई : काही दिवसांपासून झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या डेटिंगच्या बातम्या समोर येत आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं मात्र, झहीरने अनेकवेळा सोनाक्षीला डेट केल्याच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. आता पुन्हा एकदा झहीरने सोनाक्षीसोबतच्या नात्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

सोनाक्षीसोबतच्या रिलेशनवर असं म्हटलं आहे
झहीर इक्बालने स्पष्टपणे सांगितलं की, सोनाक्षीसोबतच्या त्याच्या नात्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. एका मुलाखतीत बोलताना बोलताना तो म्हणाला, 'या गोष्टींना आता बराच काळ लोटला आहे. मला त्याची पर्वाही नाही. जर तुम्ही असा विचार करत असाल तर मला काही हरकत नाही. विचार करत राहा हे तुमच्यासाठी योग्य आहे. मी सोनाक्षी सिन्हासोबत आहे हा विचार करून जर तुम्हाला आनंद होत असेल तर ठीक आहे. हे तुम्हाला निराश करत असल्यास मला माफ करा. मी फक्त इतकंच म्हणेन की, याबद्दल विचार करणं थांबवा.

सलमानने झहीरला दिला असा सल्ला 
झहीर इक्बाल पुढे म्हणाला, 'अफवा या इंडस्ट्रीचा भाग आहे. मी इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच मला याची माहिती होती. मला माहित होतं की अभिनेत्रींना या सगळ्या गोष्टींमधून जावं लागतं कारण माझे मोजकेच मित्र आहेत जे या इंडस्ट्रीचा एक भाग आहेत. सलमान भाई मला नेहमी म्हणतो की, बरेच लोकं असं लिहतील. त्याकडे जास्त लक्ष देऊ नको, म्हणून मी तेच करतो. मी त्याकडे लक्ष देत नाही'.